अमिताभ बच्चन यांनी ह्या कारणामुळे लिहिले नीना गुप्ता यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 09:10 PM2018-11-15T21:10:00+5:302018-11-15T21:10:00+5:30

नीना गुप्ता यांचा नुकताच प्रदर्शित झालेला बधाई हो चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

actress-neena-gupta-signed-another-mature-love-drama-after-badhaai-ho | अमिताभ बच्चन यांनी ह्या कारणामुळे लिहिले नीना गुप्ता यांना पत्र

अमिताभ बच्चन यांनी ह्या कारणामुळे लिहिले नीना गुप्ता यांना पत्र

googlenewsNext

आयुषमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव यांची प्रमुख भूमिका असलेला बधाई हो चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय व दमदार कथानकाच्या जोरावर हा सिनेमा बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने शंभर कोटींहून अधिक गल्ला जमवला.

बधाई हो चित्रपटातील नीना गुप्ता यांची भूमिका रसिकांना खूपच भावली. फक्त प्रेक्षकांनाच नाही तर त्यांच्या या भूमिकेने बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनादेखील भुरळ पाडली आहे. नीना गुप्ता यांच्या कामाचs खुद्द बिग बींनी कौतुक केले आहे. अमिताभ बच्चन यांनी नीना गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नीनाच्या अभिनयाचे खूपच कौतुक केले. नीना गुप्ता यांनी या पत्राचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत बच्चन यांचे आभार मानले आहेत.

चित्रपटाची स्क्रीप्ट न वाचताच वरवर कथा ऐकून नीना यांनी चित्रपटाला होकार दिला होता. गतवर्षी नीना गुप्ता यांनी काम मागणारी पोस्ट सोशल मीडियावर श्ोअर केली होती. मी मुंबईत राहते आणि काम करते. मी एक प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि एका दमदार भूमिकेच्या शोधात आहे,असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते. नीना गुप्ता यांनी  खलनायक , जाने भी दो यारों , कमजोर कडी  आणि  गांधी यासारख्या चित्रपटांत काम केले आहे.  शिवाय छोटा पडदाही गाजवला आहे.

Web Title: actress-neena-gupta-signed-another-mature-love-drama-after-badhaai-ho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.