'डाकूच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीने घेतली प्रचंड मेहनत; ४५ दिवस राहिली घरच्यांपासून दूर!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 09:00 PM2019-01-20T21:00:00+5:302019-01-20T21:00:01+5:30

या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी चंबलच्या खोऱ्यात एक महिना घालवला. त्यानंतर जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा एक आठवडा आधीच लोकेशनवर पोहोचले. एवढेच काय तर ४५ दिवस मी एकदम अंडरग्राउंड राहिले.

The actress has taken a lot of hard work for the role of a bandit. 45 days away from home! ' | 'डाकूच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीने घेतली प्रचंड मेहनत; ४५ दिवस राहिली घरच्यांपासून दूर!'

'डाकूच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीने घेतली प्रचंड मेहनत; ४५ दिवस राहिली घरच्यांपासून दूर!'

googlenewsNext

‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिला मिळालेल्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसते. आता ती लवकरच सुशांत सिंह राजपूतसोबत फिल्म ‘सोनचिड़िया’ मध्ये दिसणार आहे. या फिल्ममध्ये एका विधवा डाकू महिलेचा रोल भूमी करत आहे. भूमीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी चंबलच्या खोऱ्यात एक महिना घालवला. त्यानंतर जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा एक आठवडा आधीच लोकेशनवर पोहोचले. एवढेच काय तर ४५ दिवस मी एकदम अंडरग्राउंड राहिले. मी सर्वांशी बोलणे बंद केले होते आणि संपर्कही बंद केला होता. तिथे सर्वच कलाकारांना एक लूक देण्यासाठी सारख्याच कास्च्युमचा वापर केला गेला. पूर्ण स्टारकास्टने फिल्मची शूटिंग एकाच कॉस्च्युममध्ये केली. त्याला पूर्ण शूटिंगदरम्यान कधी धुतले गेले नाही. या फिल्मचे दिग्दर्शन अभिषेक चौबे करत आहे.

तिच्या भूमिकेबद्दल बोलताना भूमी म्हणाली, ‘मी आधी भूमिकेचा अभ्यास करते. कोणतीही भूमिका करण्याअगोदर तिला समजून घेणे गरजेचे असते. प्रत्येक चित्रपटात माझाशी हाच प्रयत्न असतो. मी या फिल्ममध्ये महिला डाकुचा रोल करत आहे. त्यामुळे मी चंबळमध्ये एक महिना घालवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून मी येथील व्यवहार आणि इतर सर्व गोष्टी समजून घेऊ शकेन. जोपर्यंत मी भूमिकेचा अभ्यास करून ते पात्र माझ्या हाती लागत नाही. तोपर्यंत मला चैन पडत नाही. याचमुळे स्वत:ला सर्वांपासून दूर केले होते. त्यासाठी जवळपास एक महिना ४५ दिवस माझे प्रियजन आणि इंटरनेटपासून दूर राहिले.’

पुढे भूमीने सांगितले की, ‘एखादे खास पात्र अंगिकारण्यासाठी आधी शिकलेल्या अनेक गोष्टी विसराव्या लागतात. तेव्हाच काहीतरी नवीन साकारता येते. त्यासाठी मी आधी घरीच राहिले. मग चंबळच्या लोकांविषयी, त्या काळाविषयी संशोधन केले. त्यानंतर मी चंबळला गेले म्हणजे तिथले वातावरण मला चांगले समजेल.

Web Title: The actress has taken a lot of hard work for the role of a bandit. 45 days away from home! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.