The actress had given her marriage to the famous actor, the husband had a divorce ... | ​या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी या अभिनेत्रीने दिला होता पतीला घटस्फोट... एका मुलाची आई होती ही अभिनेत्री
​या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी या अभिनेत्रीने दिला होता पतीला घटस्फोट... एका मुलाची आई होती ही अभिनेत्री
अनुपम खेर आणि किरण खेर यांची जोडी बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध जोडींपैकी एक मानली जाते. त्या दोघांनी आज त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे. अनुपम खेर यांनी तर हम आपके है कोन, सारांश, अ वेन्सडे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिल, राम लखन, कुछ कुछ होता है, हम, लम्हे यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत तर किरण खेर यांनी देवदास, दोस्ताना, ओम शांती ओम, वीर जारा, मैं हूँ ना यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. किरण खेर आणि अनुपम खेर यांच्या लग्नाला आज अनेक वर्षं झाली आहेत. पण खूपच कमी जणांना त्यांची प्रेमकथा माहीत आहे. किरण खेर यांचे हे दुसरे लग्न असून त्यांचे अनुपम खेर यांच्याआधी एका बिझनेसमन सोबत लग्न झाले होते. 
किरण आणि अनुपम यांनी रंगमंचावर एकत्र काम केले होते. त्यावेळी किरण यांना अनुपम यांच्याविषयी सगळी काही माहिती होते. तसेच किरण यांना अनुपम आवडतात याची देखील त्यांना या दरम्यान कल्पना आली होती. पण त्यांनी अनुपम यांना ही गोष्ट कधीच दाखवून दिली नाही. त्याचदरम्यान त्यांचे लग्न बिझनेसमन गौतम बेरीसोबत झाले. पण संसारात त्या खूश नव्हत्या. त्यांना सिकंदर हा मुलगा देखील होता. त्याचदरम्यान किरण यांची अचानक अनुपम खेर यांच्यासोबत भेट झाली. त्या एका नाटकाच्या निमित्ताने कोलकत्याला गेल्या होत्या. ती भेट अनुपम आणि किरण यांच्या आय़ुष्यासाठी खूप खास ठरली. किरण यांनी अनुपम खेर यांना अनेक वर्षांनी पाहिले, त्यावेळी त्यांच्यात खूप बदल झाला होता. अनुपम खेर यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी टक्कल केले होते. त्यांचा हा लूक पाहून किरण यांना आश्चर्य वाटले होते, कित्येक वेळ अनुपम यांच्याकडे त्या पाहातच राहिल्या होत्या. अनुपम देखील किरण यांना कित्येक वेळ केवळ पाहातच होते. त्यांना किरण यांना काहीतरी सांगायचे होते. पण त्यांची हिंमतच झाली नाही. मात्र काहीच वेळानंतर ते किरण यांच्या खोलीत गेले आणि त्यांना म्हणाले, मी तुमच्यावर प्रेम करतो... या घटनेनंतर काहीच दिवसांनी किरण यांनी पतीला घटस्फोट देऊन अनुपम यांच्यासोबत लग्न केले. 

anupam kher kirron kher

Also Read : ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चा पहिला व्हिडीओ आला समोर, हुबेहूब मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे चालताना दिसले अनुपम खेर!
Web Title: The actress had given her marriage to the famous actor, the husband had a divorce ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.