This actress gave twinkle Khanna to Akshay Kumar Chop | ​या अभिनेत्रीमुळे ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला दिला होता चोप

अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांसाठी जितका चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. ट्विंकल खन्नासोबत लग्न होण्याआधी अक्षय कुमारचे रवीना टंडन, शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण प्रचंड गाजले होते. रवीनासोबत तर त्याने साखरपुडा देखील केला असल्याचे म्हटले जाते. शिल्पा शेट्टीने तर अक्षय कुमार माझ्या भावनांशी खेळला होता असे तिच्या एका मुलाखतीत म्हटले होते. अक्षयची ही प्रेमप्रकरणे त्याच्या लग्नाच्याआधीची होती. पण लग्नानंतर देखील एक अभिनेत्री त्याच्या आयुष्यात आली होती आणि त्यावरून त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि त्याची चांगलीच भांडणं झाली होती असे म्हटले जाते.
अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांनी ऐतराज, मुझसे शादी करोगे यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. पण खऱ्या आयुष्यातही यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते आणि ही गोष्ट ट्विंकल खन्नाला कळली होती आणि तिने यावरून अक्षयला चांगलेच चोपले देखील होते. 

akshay kumar priyanka chopra


२००४मध्ये टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार गोव्यातील एका रिसोर्टमध्ये प्रियांका चोप्रावरून अक्षय आणि ट्विंकल यांची चांगलीच भांडणे झाली होती. तिथे उपस्थित असलेल्या अनेक जणांनी या दोघांना भांडताना पाहिले होते. टाइम्सने त्यांच्या बातमीत म्हटले होते की, गोव्याच्या एका रिसोर्टमध्ये अक्षय आणि ट्विंकल दोघेही एकमेकांवर जोरजोराने ओरडत होते. या भांडणाच्या दरम्यान प्रियांका चोप्रा हे नाव उपस्थित असलेल्या लोकांना सतत ऐकायला मिळत होते. अक्षय आणि ट्विंकल यांच्यात भांडण इतके वाढले होते की, ट्विंकलने सगळ्यांच्यासमोरच अक्षयला मारले होते. त्यानंतर ट्विंकल रागाने मुंबईला निघून आली होती. खरे तर अक्षय गोव्याला एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता. पण ट्विंकल आणि त्यांचा मुलगा आरव देखील गोव्याला त्याच्यासोबत गेले होते. पण भांडणानंतर ट्विंकल आरवला तिथेच सोडून निघून आली होती. पण
ट्विंकलने या सगळ्या बातम्या चुकीच्या असल्याचे त्यावेळी म्हटले होते. तिने टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मी सध्या दुबईला माझ्या एका कामात व्यग्र आहे तर माझी बहीण आणि आरव गोव्यात आहेत. लोक अशा अफवा का पसरवत आहेत हेच मला कळत नाहीये. तर अक्षयने आमच्या दोघांमध्ये असे काहीच झाले नसल्याचे म्हटले होते. 

Also Read : अक्षय कुमार गोल्डन टेम्पलला गेला, कोणी नाही पाहिला...
Web Title: This actress gave twinkle Khanna to Akshay Kumar Chop
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.