अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 06:00 AM2018-11-23T06:00:00+5:302018-11-23T06:00:00+5:30

'लव सोनिया' आणि 'स्लमडॉग मिलिनेयर' यासारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे. 

Actress Frida Pinto to get married next year? | अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत?

अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत?

googlenewsNext
ठळक मुद्देफ्रिडा बऱ्याच कालावधीपासून कोरी ट्रॅनला करतेय डेट फ्रिडा पिंटो पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार ?


 सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असून नुकतेच अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण विवाहबंधनात अडकले आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर आता 'लव सोनिया' व 'स्लमडॉग मिलिनेयर' यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी लग्नबेडीत अडकणार 
असल्याचे बोलले जात आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, फ्रिडा बऱ्याच कालावधीपासून कोरी ट्रॅनला डेट करत आहे. तो पेशाने फोटोग्राफर आहे. याच वर्षी एक सामन्यादरम्यान ते एकमेकांना किस करताना दिसले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रिडाला आता आपले रिलेशनशीप एक स्टेप पुढे न्यायचे आहेत. ते दोघेही रिलेशनशीपबाबत गंभीर आहेत. फ्रिडाला छोटे प्रायवेट अफेयर ठेवायचे आहेत. जिथे कुटुंबातील व जवळचे नातेवाईक उपस्थित असतील. फ्रिडाचा सहकलाकार व कोरीचा बेस्ट फ्रेंड अभिनेता अरूण पॉ़लमुळे त्यांची ओळख झाली आहे.
फ्रिडाचे 'स्लमडॉग मिलिनेयर'मध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता देव पटेल याच्यासोबत अफेयर होते. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते विभक्त झाले.

Web Title: Actress Frida Pinto to get married next year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.