Actor will work on two films after Honeymoon | हनीमूननंतर दोन चित्रपटांवर काम करणार ‘हा’ अभिनेता!

सध्या बी-टाऊनमध्ये लग्नाचा मौसम सुरू आहे. एकामागोमाग एक लग्नाचे बार उडताना दिसत आहेत. आधी सोनम कपूर-आनंद अहुजा, मग नेहा धुपिया-अंगद बेदी आणि आता अलीकडेच हिमेश रेशमिया-सोनिया कपूर हे विवाहबंधनात अडकले. ते सध्या हनिमूनसाठी गेले आहेत. हिमेश रेशमिया जरी सध्या सोनिया कपूरसोबत दुबईत हनिमूनचे काही रोमँटिक क्षण एन्जॉय करत असेल तरीही तो त्याच्या कामाच्या बाबतीत एकदम सतर्क आहे. तो तिथेही त्याच्या फिटनेसची काळजी घेतो. एवढेच नव्हे तर त्याने हनिमूनहून परतण्यापूर्वीच एक खुलासा केला आहे. खुलाश्यानुसार तो सांगतो,‘हनिमूनहून परतल्यानंतर मी लगेचच दोन चित्रपटांचे काम हाती घेणार आहे.’

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया याने ११ मे २०१८ रोजी गर्लफ्रेंड सोनिया कपूूर हिच्याशी लग्न केले. मात्र याचदरम्यान, हिमेशने सोशल मीडियावर हनिमूनचा एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघांचाही अंदाज बघण्यासारखा आहे. सध्या इंटरनेटवर हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यास पसंतही केले जात आहे. यावेळी हिमेशने एक व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केले. ज्यामध्ये तो वर्कआउट करताना बघावयास मिळत आहे. त्यानंतर हिमेशने सोनियासोबत आणखी एक सुंदर फोटो शेअर केला. दरम्यान, सोनिया आणि हिमेश गेल्या कित्येक वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. सोनिया लग्नानंतर आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरला गुडबाय करू शकते. सोनियाला इंडस्ट्रीपासून दूर आपल्या वैवाहिक जीवनात रममाण व्हायचे आहे. फॅमिली लाइफ एन्जॉय करण्याची तिची इच्छा आहे. 
  
सुत्रांनुसार, हिमेश रेशमिया याने दोन चित्रपटांबाबत तात्पुरती घोषणा केली आहे. या दोन्ही चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका चित्रपटााचे कबीर सदानंद हे दिग्दर्शित करणार आहेत. सध्या तरी त्याने या दोन चित्रपटांबाबत एवढाच खुलासा केला आहे. चित्रपटाबाबतील इतर बाबी सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: Actor will work on two films after Honeymoon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.