'Actor turned out to refuse girlfriend'! | ‘या’ अभिनेत्याचा खुलासा, ‘गर्लफ्रेंडने नकार दिल्यानेच अभिनेता झालो’!

अभिनेता साकिब सलीम आणि तापसी पन्नू स्टारर ‘दिल जंगली’ हा चित्रपट गेल्या ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा केला नाही, परंतु साकिबने प्रमोशनदरम्यान त्याच्याबद्दल एक असे रहस्य उघड केले जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. हे रहस्य अभिनेता साकिब सलीम यांच्या फिल्मी करिअरशी संबंधित आहे. एका रेडिओ शोमध्ये बोलताना साकिबने सांगितले की, मी मुंबईत चित्रपटांमध्ये करिअर बनविण्यासाठी नव्हे तर एका मुलीच्या मागे आलो होतो. मात्र त्या मुलीने मला धोका दिल्याने मी रोजीरोटीसाठी चित्रपटसृष्टीत नशीब आजमाविले. साकिबचा हा किस्सा वाचून धक्का बसला ना? आता आम्ही तुम्हाला हाच किस्सा विस्तृतपणे सांगणार आहोत. साकिब दिल्लीत राहात होता, तेव्हा मुंबईतील एका मुलीच्या लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये होता. दोघांमधील हे अंतर दिवसेंदिवस वाढतच गेल्याने अखेर त्या तरुणीने लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा ब्रेकअप केलेले बरे असे म्हटले. त्या तरुणीचे हे शब्द ऐकून साकिब काहीसा भावुक झाला. त्याने तिला असे करून नको म्हणून गळ घातली. तसेच तुझ्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे सांगितले. तरुणीने साकिबची ही आॅफर संधी म्हणून समजली. तिने लगेचच त्याला मुंबईत येण्यास सांगितले. साकिबनेही लगेचच बॅग पॅक करून मुंबई गाठली. मात्र येथे येऊनही त्याला ‘प्यार मे धोका’च मिळाला. त्या तरुणीने साकिबला नकार देताना त्याच्याशी ब्रेकअप केले. त्यानंतर साकिबने दोन वेळच्या रोजीरोटीसाठी फिल्मी जगतात पाऊल ठेवण्याचा विचार केला. नशिबाने त्याला इंडस्ट्रीत काम मिळण्यास सुरुवात झाली. साकिबच्या ‘दिल जंगली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आलिया सेन शर्माने केले. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही, मात्र साकिबच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. 
Web Title: 'Actor turned out to refuse girlfriend'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.