Actor Sohail Khan's brother thought of 'Afar's church' | अफेअरच्या चर्चांना वैतागून ‘या’ अभिनेत्रीने सोहेल खानला मानले भाऊ !

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्याबाबतचा हा किस्सा आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गॅँग्स आॅफ वासेपुर’ या चित्रपटातून हुमाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. जेव्हा हुमा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिच्यावर काहींनी टीकाही केली. परंतु तिने अभिनयाच्या जोरावर टीकाकारांना उत्तर दिले. ‘गॅँग्स आॅफ वासेपुर’मधील तिचा अभिनया एवढा सर्वोत्कृष्ट जमला की, या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस आली. दोन्ही भागांमध्ये हुमाने केलेल्या उत्कृष्ट अभिनयामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. खरं तर बी-टाउनमध्ये हुमा तेव्हादेखील चर्चेत आली होती जेव्हा अभिनेता तथा दिग्दर्र्शक सोहेल खान याच्याबरोबर तिचे नाव जोडले गेले. सगळीकडेच हुमा आणि सोहेलमधील अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. या चर्चांमुळे हुमा एवढी वैतागली होती की, तिने या चर्चा कायमच्या बंद करण्यासाठी एक हटके फंडा वापरला. 

दिल्ली येथे २८ जुलै १९८६ मध्ये हुमा कुरेशीचा जन्म झाला. हुमाने तिच्या अभिनयाची सुरुवात छोट्या-मोठ्या जाहिरातींमधून केली. जेव्हा ती एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मुंबईत आली होती, तेव्हा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची नजर तिच्यावर पडली. जाहिरातीमधील हुमाचे काम बघून अनुराग खूपच प्रभावित झाले. पुढे त्यांनी तिला थेट त्यांच्या चित्रपटात काम करण्याचे निमंत्रण दिले. पहिल्याच चित्रपटातून हुमाला चांगली प्रसिद्धी मिळाली. पुढे तिचे नाव थेट सोहेल खानशी जोडले गेल्याने, तिला ओळखही मिळाली. सोहेल आणि हुमाच्या अफेअरच्या चर्चा बी-टाउनमध्ये चांगल्याच रंगू लागल्या. मात्र एका मुलाखतीदरम्यान जेव्हा तिला सोहेलसोबतच्या नात्याविषयी विचारण्यात आले तेव्हा ती दंग राहिली. हुमाने या प्रश्नाचे उत्तर देताना सोहेल माझ्या भावासारखा असल्याचे म्हटले. हुमाने म्हटले होते की, ‘माझ्या आणि सोहेलमधील अफेअरच्या अफवा खूपच खाणेरड्या पद्धतीने पसरविल्या जात आहेत.’ यावेळी हुमाला विचारण्यात आले की, तू अशाप्रकारच्या अफवांचा कसा सामना करतेस? तेव्हा तिने म्हटले की, ‘खरं तर मी अशाप्रकारच्या अफवांचा कधीच विचार करीत नाही. शिवाय अशा अफवांमुळे मानसिक त्रासही करून घेत नाही. मी नेहमी हा विचार करते की, टीकाकारांसोबत तुमचे नाते नेहमीच महत्त्वपूर्ण असते. 
Web Title: Actor Sohail Khan's brother thought of 'Afar's church'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.