The actor had done Zainat Aman to the huge assault | ​या अभिनेत्याने झीनत अमानला केली होती प्रचंड मारहाण

झीनत अमानने तिच्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सत्यम शिवम सुंदरम, कुर्बानी, लावारिस, हरे रामा हरे कृष्णा, डॉन, धर्म वीर, हिरा पन्ना, रोटी कपडा और मकान यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. झीनत अमानच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. तिला सत्तरीच्या दशकातील एक बोल्ड अभिनेत्री मानले जाते. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटात तिने दिलेल्या बोल्ड दृश्याची आजही चर्चा केली जाते. 

sanjay khan

झीनत अमानच्या व्यवसायिक आयुष्यासोबत तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. झीनत अमानचे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले. अभिनेता संजय खानसोबतच्या अफेरची तर चांगलीच चर्चा झाली होती. संजय खानचे लग्न झाले असले तरी झीनत अमान त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. संजयला तीन मुले होती. पण तरीही संजय देखील त्याचा संसार विसरून झीनतमध्ये गुंतत चालला होता. अबदुल्ला या चित्रपटात संजय खान आणि झीनत अमान यांनी एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये सूत जुळले होते. संजय खान झीनत अमानवर प्रचंड प्रेम करत असला तरी तो अनेक वेळा तिला मारहाण देखील करायचा. सिने ब्लिट्सच्या रिपोर्टनुसार १९८० ला संजयने एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जीनतला खूप मारले होते. संजयने झीनतला मारहाण केली त्यावेळी हॉटेलमध्ये अनेक जण उपस्थित होते. पण कोणीही संजय आणि झीनतच्या प्रकरणात पडले नाही. संजय आणि झीनतच्या अब्दुल्ला या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळीच ही गोष्ट घडली होती. अब्दुलाच्या एका गाण्याचे पुन्हा चित्रीकरण करायचे असल्याने संजय तिला सतत बोलवत होता. पण झीनत एका दुसऱ्याच चित्रपटाचे चित्रीकरण लोणावळ्याला करत होती. त्यामुळे तिला लगेचच येणे शक्य नसल्याचे तिने संजयला फोनवर सांगितले. त्यावर ती ज्या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे, त्या चित्रपटाच्या निर्मात्यासोबत तिचे शारीरिक संबंध असल्याचा संजयने आरोप केला होता. हे सगळे ऐकून रागाच्या भरात झीनत संजयच्या घरी पोहोचली. पण त्यावेळी संजय एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी करत असल्याचे तिला कळले. झीनत त्याला भेटायला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचली असता तू इथे काय करत आहेस असे विचारत संजयने तिला मारहाण केली होती.

Also Read : ​​झीनत अमान आणि झरिना वहाब दिसणार लव्ह लाइफ स्क्रू अप्स या वेबसिरिजमध्ये
Web Title: The actor had done Zainat Aman to the huge assault
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.