The actor is called the South Film Industry's 'Ambani', a new movie released every 15 days! | या अभिनेत्याला म्हणतात साउथ फिल्म इंडस्ट्रीचे ‘अंबानी’, दर १५ दिवसाला रिलीज होतो नवा चित्रपट!

गेल्या काहीकाळाचा विचार केल्यास हिंदी प्रेक्षकांमध्ये साउथ चित्रपटांबद्दल रूची वाढताना दिसत आहे. साउथ चित्रपटांमधील कलाकारच नव्हे तर चित्रपटांच्या कथाही प्रेक्षकांना भावत आहेत. अशात आम्ही आज तुम्हाला साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयी सांगणार आहोत. ५९ वर्षीय मोहनलाल यांनी त्यांच्या ३८ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या बºयाचशा चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवरदेखील शंभर कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे. 


सातत्याने त्यांचे चित्रपट हिट होत असल्याने त्यांची तुलना महानायक अमिताभ बच्चन यांच्याशीदेखील केली जाते. एक काळ तर असा होता की, त्यांच्या लोकप्रियतेने प्रचंड उच्चांक गाठला होता. १९८२ ते १९८६ दरम्यान दर १५ दिवसांनी त्यांचा चित्रपट प्रदर्शित व्हायचा. आजदेखील ते ५९व्या वर्षातही  अभिनेता म्हणून चित्रपट करतात. मोहनलाल यांच्या ‘जनता गैराज’ या चित्रपटाने तर बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. या चित्रपटात ते जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स देताना दिसून आले. अभिनयाबरोबरच मोहनलाल यांना तायक्वांदोचाही छंद आहे. २०१२ मध्ये वर्ल्ड तायक्वांदोच्या वतीने मोहनलाल यांना ‘ब्लॅक बेल्ट’ने सन्मानित केले होते. तुमच्या माहितीसाठी या अगोदर मोहनलाल एक प्रोफेशनल रेसलर राहिले आहेत. त्यांच्याकडे लोकप्रियता तर आहेच शिवाय श्रीमंतीही आहे. ते साउथचे एकमेव अभिनेते आहेत, ज्यांचा बंगला जगातील सर्वांत उंच इमारत बुर्ज खलिफा येथे आहे. त्यामुळे त्यांना साउथचे अंबानी असेही म्हटले जाते. 
Web Title: The actor is called the South Film Industry's 'Ambani', a new movie released every 15 days!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.