Actor of Bollywood, Aghori Baba plays a role in Tamil cinema | ​बॉलिवूडचा हा अभिनेता तामीळ सिनेमामध्ये साकारतोय अघोरी बाबाची भूमिका

हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘हिरो’ अशी अभिनेता जॅकी श्रॉफ यांची ओळख आहे. मुंबैय्या डायलॉग शैली, वागणं मुंबैय्या.. यामुळे जॅकी यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. अभिनयातील वैविधता आणि भूमिका कोणतीही असो त्याला पुरेपूर न्याय जॅकी यांनी दिला आहे. प्रमुख अभिनेता, सहकलाकार, खलनायक किंवा मग कॉमेडी...भूमिका कोणतीही असो जॅकी यांनी सगळ्याच भूमिका खूप चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. फेब्रुवारी १९५८ रोजी दक्षिण मुंबईतील ग्रॅण्ट रोडस्थित एका चाळीमध्ये जयकिशन यांचा (जॅकी) जन्म झाला. जॅकीदा यांचे वडील गुजराथी होते, तर आई कझाकिस्तानची होती. जॅकी श्रॉफ यांना आज इंडस्ट्रीमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. जॅकी श्रॉफ यांनी परिंदा, गर्दीश, खलनायक, रंगीला, अग्निसाक्षी, १९४२ अ लव्ह स्टोरी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य, बंगाली, भोजपूरी, मराठी, ओरिसा, पंजाबी अशा विविध भाषांमध्ये देखील काम केले आहे. हिंदी चित्रपटांइतकेच त्यांचे इतर भाषांमधील चित्रपट देखील तितकेच हिट झाले आहेत. आता प्रेक्षकांचा हा लाडका जग्गू दादा एका तामीळ चित्रपटात झळकणार असून या चित्रपटातील त्यांचा लूक हा त्यांच्या आजवरच्या सगळ्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. कस्तुरी राजा यांनी दिग्दर्शित केलेल्या पांडी मुनी या चित्रपटात जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. कस्तुरी राजा हे दक्षिणेतले एक प्रसिद्ध दिग्दर्शक असून अभिनेता धनुष हा त्यांचा मुलगा आहे. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या थुलवाडो इलमाई या चित्रपटाद्वारे धनुषने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पांडी मुनी या चित्रपटाद्वारे कस्तुरी राजा जवळजवळ दहा वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्राकडे वळले आहेत. 
पांडी मुनी या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांची भूमिका एका अघोरी साधूची असून जॅकी श्रॉफ यांच्यासोबत या चित्रपटात निकेशा पटेल आणि मेघाली मुख्य भूमिकेत आहेत. देव आणि दानवामधला संघर्ष प्रेक्षकांना या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. जॅकी श्रॉफ त्यांच्या या नव्या भूमिकेबाबत खूप उत्सुक आहेत.

Also Read : मुंगफली विकणारा मुलगा बनला बॉलिवूडचा मोठा सुपरस्टार; वाचा ‘या’ अभिनेत्याचा संघर्षमय प्रवास! 
Web Title: Actor of Bollywood, Aghori Baba plays a role in Tamil cinema
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.