-रवींद्र मोरे 
अलिकडेच 'बागी 2' चा ट्रेलर रिलीज झाला. जबरदस्त अ‍ॅक्शनने परिपूर्ण या ट्रेलरने चित्रपटाविषयीची आपली उत्सुकता नक्कीच वाढविली आहे. या चित्रपटात टायगरचा लूकच बदलला नाही तर अ‍ॅक्शन स्टाइलही बदललेली दिसत आहे. या वर्षी 'बागी 2' या अ‍ॅक्शनपटाव्यतिरिक्त अन्यदेखील काही अ‍ॅक्शन चित्रपट दर्शकांना बघावयास मिळणार आहेत. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत... 

Image result for race 3

* रेस 3
रेस अशी फ्रॅन्चाइजी आहे, जी रहस्य, रोमांच आणि जबरदस्त अ‍ॅक्शनसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे तिसºया भागात आता सलमान खानची एन्ट्री झाली आहे, ज्याची अ‍ॅक्शन आपण 'टायगर जिंदा है' मध्ये पाहिली आहे. 'रेस 3' मध्ये सलमानबरोबरच बॉबी देओल आणि साकिब सलीमदेखील आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रेमो डिसूजाने स्वीकारली असून चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि डेझी शाह हे देखील लीड रोल प्ले करणार आहेत.  * ड्राइव

सुशांत सिंह राजपूतच्या ड्राइव्ह चित्रपटात अ‍ॅक्शनचा तडका लावलेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सुशांत पहिल्यांदाच जॅकलिन फर्नांडिसबरोबर पडद्यावर दिसणार आहे. सोबतच त्याचा हा पहिला अ‍ॅक्शन प्रधान चित्रपट असणार आहे. या चित्रपटाला तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केले आहे.   

Image result for thugs of hindustan

* ठग्स आॅफ हिंदोस्तान
'धूम3' नंतर आमिर खान पुन्हा एकदा 'ठग्स आॅफ हिंदोस्तान' चित्रपटात अ‍ॅक्शनची कर्तब दाखविणार आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या अ‍ॅडव्हेंचर-अ‍ॅक्शन ड्रामामध्ये अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यंदा दिवाळीला रिलीज होणार असून यशराज बॅनरचा हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. सुमारे २०० करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात समुद्री जहाजांवर काही अ‍ॅडव्हेंचर-अ‍ॅक्शन दृश्य चित्रीत केले जात आहेत.  * जंगली

अ‍ॅक्शनच्या माध्यमातून दर्शकांचे मन जिंकणारा अ‍ॅक्टर विद्युत जाम्वालचा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'जंगली'देखील याच वर्षी रिलीज होत आहे. हत्तींची शिकार आणि त्यांच्या दातांची तस्करी या विषयावर बनत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमेरिकन दिग्दर्शक चक रसल करत आहेत. 

Image result for simba bollywood movie

* सिम्बा
अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी पहिल्यांदाच रणवीर सिंह सोबत चित्रपट बनवत आहेत, ज्याचे नाव आहे 'सिम्बा'. या चित्रपटात रणवीर सिंह एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. रोहितच्या फिल्म मेकिंग स्टाइलनुसार सिम्बामध्ये अ‍ॅक्शनसोबत कॉमेडीचाही तडका लावलेला असेल, यात शंका नाही.  
 
Related image

* साहो
यंदा रिलीज होणाऱ्या अ‍ॅक्शन चित्रपटांच्या यादीत 'साहो'चाही उल्लेख करावा लागेल. कारण या चित्रपटात बाहुबली अ‍ॅक्टर प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साहो हा बहुभाषीक चित्रपट असून तमिळ, तेलुगु आणि हिंदीमध्ये बनविला जात आहे. साहोमध्ये श्रद्धा कपूर प्रभाससोबत पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. सुजित दिग्दर्शित या चित्रपटाचा बजेट सुमारे १८० करोड असल्याचे समजते. नील नितिन मुकेश आणि जॅकी श्रॉफदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.  
Web Title: Action Movies: This year the audience will get 'action' banquet!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.