Acting on the 'topless' movement against casting cowhook was a time of homeless !! | कास्टिंग काऊचविरोधात ‘टॉपलेस’ आंदोलन करणा-या अभिनेत्रीवर आली बेघर होण्याची वेळ!!

तेलगू चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउचविरोधात रस्त्यावर उतरणारी अभिनेत्री श्री रेड्डी खरोखरचं रस्त्यावर आली आहे. होय, कास्टिंग काउचविरोधात टॉपलेस आंदोलन केल्यामुळे घरमालकाने श्री रेड्डीला ताबडतोब घर खाली करण्याचे बजावले आहे. श्री रेड्डीने स्वत: सोशल अकाऊंटवर ही माहिती दिली. माझ्या घरमालकाने मला कॉल केला आणि ताबडतोब घर खाली करण्याचे बजावले. या संकुचित मानसिकतेच्या मानसाची भाषा अतिशय असभ्य होती. मोठ्या माणसांचा ‘गेम’ सुरू झालाय...असे श्री रेड्डीने लिहिले आहे.गत शनिवारी श्री रेड्डीने कास्टिंग काऊचविरोधात तेलगू फिल्म चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयाबाहेर टॉपलेस होत आंदोलन केले होते.  तेलगू इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या श्री रेड्डीने तेलगू फिल्म चेंबरकडे  कास्टिंग काउचबाबत तक्रार केली होती. पण फिल्म चेंबरने तिच्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली नाही. अखेर श्री रेड्डीने फिल्म चेंबरबाहेरचं कॅमे-यासमोर टॉपलेस होण्याचा निर्णय घेतला. कॅमेºयासमोर तिने कपडे उतरवणे सुरू केले. तिचे ते कृत्य पाहून सगळीकडे खळबळ माजली. काही क्षणात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी श्री रेड्डीला तेथून बाजूला केले. यावेळी तिने कास्टिंग काउचमध्ये अडकलेल्या अनेक बड्या नावांचा खुलासा करण्याची धमकी दिली होती. तेलगू फिल्म इंडस्ट्री माझ्यासारख्या अभिनेत्रींना संधी नाकारली जाते. मला तेलगू फिल्म चेंबर आॅफ कॉमर्सचे सदस्यत्व हवे आहे. पण चेंबर मला सदस्यत्व देण्यास तयार नाही.मी काम मागितले की, न्यूड फोटो आणि व्हिडिओची मागणी केली जाते. केवळ ही मागणी पूर्ण करत नसल्याने मला संधी नाकारली जात आहे, असा आरोप श्री रेड्डीने यावेळी केला होता. 

ALSO READ : अन् कास्टिंग काउचच्या विरोधात अभिनेत्रीने रस्त्यावर उतरवले कपडे; टॉपलेस होऊन केले आंदोलन!

सुमारे आठवडाभरापूर्वी श्री रेड्डीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका दिग्गज तेलगू दिग्दर्शकावर आरोप केले होते. हा बडा दिग्दर्शक काही दिवसांपासून माझ्या घरासमोर घिरट्या घालत असल्याचे तिने म्हटले होते. शिवाय त्या दिग्दर्शकावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तो मला व्हिडिओ कॉल करायला सांगतो, असेही ती म्हणाली होती.
Web Title: Acting on the 'topless' movement against casting cowhook was a time of homeless !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.