'This' act done by a person in love with the actress, the video got viral! | ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेड्या झालेल्या व्यक्तीने केले असे कृत्य, व्हिडीओ झाला व्हायरल!

‘कोलावरी डी’ असे गाणे होते, ज्याने संपूर्ण देशाला वेड लावले होते. अभिनेता आणि निर्माता असलेल्या धनुषला तर या गाण्याने रातोरात सुपरस्टार बनविले होते. आता पुन्हा एकदा साऊथचे असेच गाणे आले असून, प्रेक्षकांना त्याने वेड लावले आहे. काहीसे ‘कोलावरी डे’प्रमाणे असलेल्या या गाण्यात एक असा व्यक्ती दाखविला आहे, जो अभिनेत्रीच्या प्रेमात अक्षरश: वेडा झाला आहे. साऊथची सुपरस्टार नयनताराच्या आगामी ‘कोलामावु कोकिला (कोको)’ मधील ‘कल्याणा वायासु’ हे गाणे सध्या इंटरनेटवर वाºयासारखे व्हायरल होत आहे. या तामिळ गाण्याचे जेवढे चांगले म्युझिक आणि लिरिक्स आहे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ते गाणे चित्रितही करण्यात आले आहे. ज्यामुळे हे गाणे वारंवार बघण्याची प्रेक्षकांना इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. १६ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला यू ट्यूबवर आतापर्यंत ७३ लाखांपेक्षा अधिक वेळा बघण्यात आले आहे. 

नयनतारा या गाण्यात गावातील मुलीच्या अंदाजात बघावयास मिळत असून, तिची स्टाइल खूपच सिम्पल आहे. गाण्यात योगी बाबू नयनताराला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना बघावयास मिळतो. त्यासाठी तो विविध फंडे वापरतो. योगी बाबूला आतापर्यंत आपण केवळ कॉमेडी भूमिकेत बघितले आहे. परंतु या गाण्यात तो हिरोच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. वास्तविक चित्रपटाबद्दल अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची डिटेल्स रिलिज करण्यात आलेली नाही. परंतु योगी बाबू आणि नयनताराची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. योगी बाबू नयनताराला या गाण्यामधून हे सांगताना दिसतो की, त्याच्या कुटुंबातील मंडळी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत आहेत. कारण त्याचे वय झाले आहे. मात्र तो प्रत्येकवेळी हे सांगून टाळतो की, योग्य मुलगी मिळाली नसल्यानेच लग्न केले नाही. योगी नयनताराला इम्प्रेस करण्यासाठी क्रिकेट खेळण्यापासून ते फटाके फोडण्यापर्यंत सर्व काही करण्याचा प्रयत्न करतो. मात्र नयनतारा त्याला म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही. गाण्यातील दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी असून, प्रेक्षकांना ती प्रचंड भावत आहे. 

दरम्यान, हे गाणे गेल्या १६ मे रोजी प्रदर्शित झाले असून, यू ट्यूबवर तुफान बघितले जात आहे. ‘कोलामावु कोकिला’ या चित्रपटाला नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. आता प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागून आहे. 
Web Title: 'This' act done by a person in love with the actress, the video got viral!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.