Above ... Priyanka Chopra's 'this' dress will cost you a price! | अबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्रेसची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल!

बॉलिवूडमध्ये कलाकार नेहमीच त्यांच्या हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असतात. अतिशय महागडे शौक ठेवणारे कलाकार लाखो रुपयांचे ड्रेस परिधान करून आपल्या स्टाइलचा जलवा दाखवितात. काही सेलिब्रिटी तर शूज, बेल्ट, पर्स यावर लाखो रुपयांची उधळण करतात. महागडे शौक ठेवण्यास सर्वात आघाडीवर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा क्रमांक लागतो. त्यामुळेच ती नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. होय, प्रियांका नुकतीच एका इव्हेंटमध्ये बघावयास मिळाली होती. यावेळी तिने निळ्या रंगाचा जंपसूट घातला होता. 

या ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती. हा ड्रेस जणूकाही तिच्या सौंदर्यात चार चॉँद लावत होता. त्यामुळेच इव्हेंटमध्ये सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. परंतु तुम्हाला माहिती आहे काय प्रियांकाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत काय असेल? नाही ना? तर आम्ही याबाबतचा खुलासा करणार आहोत. होय, प्रियांकाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत जवळपास १,४६,३५० रुपये इतकी आहे. धक्का बसला ना? देसी गर्लची फॅशन आणि तिची पसंत ही नेहमीच हटके राहिली आहे. यावेळेसदेखील प्रियांकाने अशीच काहीशी हटके स्टाइल करून सर्वांना धक्का दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रियांकाच्या आगामी ‘किड लाइक जॅक’ या दुसºया हॉलिवूडपटाचा ट्रेलर रिलीज झाला. याशिवाय लवकरच तिचा आगामी ‘क्वांटिको’ या टीव्ही शोचा तिसरा सीजन सुरू होत आहे. सध्या पीसी भारतात परतली असून, ती काही बॉलिवूड प्रोजेक्टवर काम करीत आहे. सूत्रानुसार प्रियांका, सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटात त्याच्या अपोझिट बघावयास मिळू शकते. प्रियांकाने हा चित्रपट साइन केला असून, लवकरच ती त्यात काम करणार असल्याची चर्चा आहे. 
Web Title: Above ... Priyanka Chopra's 'this' dress will cost you a price!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.