'बंटी और बबली'चा सिक्वल सध्या तरी नाही - अभिषेक बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 01:02 PM2018-09-04T13:02:46+5:302018-09-04T13:05:38+5:30

'बंटी और बबली' या सिनेमाच्या सिक्‍वलची तयारी सुरू झाल्याचे समजते आहे. मात्र त्यासाठी आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, असे अभिषेकने सांगितले. 

Abhishek Bachchan revealed that not now a sequel of 'Bunty Aur Babli' | 'बंटी और बबली'चा सिक्वल सध्या तरी नाही - अभिषेक बच्चन

'बंटी और बबली'चा सिक्वल सध्या तरी नाही - अभिषेक बच्चन

googlenewsNext
ठळक मुद्देआदित्य चोप्राकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही - अभिषेकअभिषेक बच्चन 'मनमर्जियां'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र

अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा सुपरहिट ठरलेला चित्रपट 'बंटी और बबली'चा सिक्‍वल करण्याचा विचार आदित्य चोप्रा करत होता. मात्र त्या सिक्‍वलला अनुसरून चांगली कथा न मिळाल्याने त्याला हा नाद सोडून द्यावा लागला. आता पुन्हा या सिनेमाच्या सिक्‍वलची तयारी सुरू झाल्याचे समजते आहे. मात्र त्यासाठी आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, असे अभिषेकने सांगितले. 


२००५ साली प्रदर्शित झालेला 'बंटी और बबली' चित्रपट क्राइम थ्रिलरवर आधारीत असून हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील अमिताभ बच्चन व ऐश्वर्या बच्चन यांचे 'कजरारे...' हे गाणे लोकांना खूप भावले होते. तसेच यातील इतर गाणी रसिकांना आवडली होती. मात्र सध्या तरी बंटी और बबलीच्या सिक्‍वलमध्ये आपण काम करत नसल्याचेही अभिषेकने स्पष्ट केले आहे. 'धूम 4' मध्येही अभिषेक बच्चन असल्याचे बोलले जात आहे. त्याबद्दलही अभिषेकने स्पष्टीकरण दिले आहे. या सिनेमाबाबत आदित्य चोप्राकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आपल्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर आपण विश्‍वास ठेवायला तयार नाही, असे तो म्हणाला. 
सध्या अभिषेक बच्चन आगामी चित्रपट 'मनमर्जियां'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अभिषेक 'मनमर्जियां' या चित्रपटाद्वारे दोन वर्षानंतर कमबॅक करत आहे. या चित्रपटाची स्टोरी आवडल्यामुळेच त्याने हा चित्रपट स्वीकारला असे तो सांगतो.  या चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय यांनी अभिषेकला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. या चित्रपटाच्या अनुभवाविषयी अभिषेक सांगतो, आनंद एल राय यांनी या चित्रपटाची कथा ऐकवल्यावर या चित्रपटाच्या कथेच्या मी प्रेमातच पडलो होतो. अनुराग कश्यप हा खूप चांगला दिग्दर्शक असून त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.


 

Web Title: Abhishek Bachchan revealed that not now a sequel of 'Bunty Aur Babli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.