Abhishek Bachchan refused to film Priyanka Chopra, Aishwarya is not there? | प्रियांका चोप्रासोबत चित्रपट करण्यास अभिषेक बच्चनने दिला नकार, यामागे ऐश्वर्या तर नाही ना?
प्रियांका चोप्रासोबत चित्रपट करण्यास अभिषेक बच्चनने दिला नकार, यामागे ऐश्वर्या तर नाही ना?
देसी प्रियांका चोप्राच्या बॉलिवूड कमबॅकवरून सुपरस्टार सलमान इतका उत्साहित आहे की, त्याने तिला चक्क बारा कोटी रूपये फिस देण्यास होकार दिला आहे. तर दुसरीकडे अभिषेक बच्चनने ‘दोस्ताना’ आणि ‘द्रोणा’मध्ये को-स्टार असलेल्या प्रियांकासोबत काम करण्याची आॅफर स्पष्ट शब्दात नाकारली आहे. यावरून आता बॉलिवूडमध्ये एकच चर्चा रंगली असून, त्यामागे अभिषेकची पत्नी ऐश्वर्या रायचा हात असल्याचे बोलले जात आहे. 

त्याचे झाले असे की, ‘मार्गरीटा विद ए स्ट्रॉ’ची दिग्दर्शक शोनाली बोसने अभिषेकला एक चित्रपट आॅफर केला होता. चित्रपटात त्याच्या पत्नीच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राला अ‍ॅप्रोच केले गेले. चित्रपटाची कथा एका तेरा वर्षीय मुलीवर आधारित आहे. जी ‘लाइलाज’ या आजाराने ग्रस्त आहे. याच आजाराशी लढा देताना तिचे निधन होते. त्यानंतरच्या घडामोडीवर आधारित ही कथा आहे. सुरुवातीला अशी बातमी होती की, अभिषेक बच्चन तेरा वर्षीय मुलीच्या वडिलांची भूमिका साकारण्यात तयार आहे. मात्र काही दिवसांनंतर त्याने या प्रोजेक्टमधून हात अखडता घेतल्याचे समोर आले. मात्र त्याच्या या नकारास पत्नी ऐश्वर्या असल्याची बातमी आता समोर येत आहे. ऐश्वर्याच्या सागण्यावरूनच त्याने चित्रपटातून माघार घेतली आहे. वास्तविक आता ऐश्वर्याकडून याबाबतचा खुलासा करताना या सर्व चर्चांचे खंडन केले आहे. ऐश्वर्या रायच्या टीमने केलेल्या खुलाशात म्हटले की, इंटरनेटवर गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या पसरविल्या जात आहेत की, ऐश्वर्यानेच अभिषेक बच्चनला सल्ला दिला की, त्याने शोनाली बोसच्या चित्रपटात काम करू नये. तुमच्या माहितीसाठी अभिषेक बच्चनने त्याच्या विचाराने हा चित्रपट रिजेक्ट केला आहे. मात्र अशातही कारण नसताना ऐशचे नाव यामध्ये घेतले जात आहे. 

शोनाली बोसचा हा चित्रपट मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरीची बायोपिक आहे. आयशाला वयाच्या तेराव्या वर्षीच पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार झाला होता. २४ जानेवारी २०१८ मध्ये तिने या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी तिचे वय केवळ १८ वर्ष इतके होते. आयशाची भूमिका दंगल गर्ल जायरा वसीम साकारणार आहे. 
Web Title: Abhishek Bachchan refused to film Priyanka Chopra, Aishwarya is not there?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.