अभिषेक बच्चनला नागपूरमध्येही भेटली ऐश्वर्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 09:00 PM2018-08-25T21:00:24+5:302018-08-25T21:02:32+5:30

अभिषेकने स्टेजवर येताच रसिकांशी संवाद साधला आणि गप्पा मारता मारता तो चक्क ऑडियन्स मध्ये गेला. सगळ्यांशी गप्पा मारत असताना ऑडियन्स मधील एक लहान मुलगी अभिषेकच्या जवळ आली. अभिषेकने देखील या मुलीला जवळ घेतले आणि तिला तिचे नाव विचारले. तिचे नाव ऐकून अभिषेकच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

abhishek bachchan met Aishwarya at the time of manmarziyan promotion in nagpur | अभिषेक बच्चनला नागपूरमध्येही भेटली ऐश्वर्या

अभिषेक बच्चनला नागपूरमध्येही भेटली ऐश्वर्या

googlenewsNext

अभिनेता अभिषेक बच्चन, तापसी पन्नू यांच्या आगामी 'मनमर्जिया' सिनेमाची धमाकेदार म्युझिकल टूर नागपूरमध्ये  मनकापूर इनडोअर स्टेडियममध्ये सुरु असून लोकमतने आयोजित केली आहे. अभिषेकने स्टेजवर येताच रसिकांशी संवाद साधला आणि गप्पा मारता मारता तो चक्क ऑडियन्स मध्ये गेला. सगळ्यांशी गप्पा मारत असताना ऑडियन्स मधील एक लहान मुलगी अभिषेकच्या जवळ आली. अभिषेकने देखील या मुलीला जवळ घेतले आणि तिला तिचे नाव विचारले. तिचे नाव ऐकून अभिषेकच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. कारण तिचे नाव दुसरे काहीही नसून ऐश्वर्या होते. तिला भेटून तो इतका खुश झाला कि तिला घेऊन तो थेट स्टेज वर गेला आणि तिच्यासोबत मस्त गप्पा मारल्या. उपस्थित गर्दी पाहून अभिषेक चांगलाच भारावला होता. त्याने स्टेज वरून सगळ्यांसोबत सेल्फी काढला. 

अभिनेता अभिषेक बच्चनतापसी पन्नू यांच्या आगामी 'मनमर्जिया' सिनेमाची धमाकेदार म्युझिकल टूर नागपूरमध्ये  मनकापूर इनडोअर स्टेडियममध्ये सुरु असून लोकमतने आयोजित केली आहे. अमित त्रिवेदीने उडता  पंजाब या चित्रपटातील गाण्याद्वारे कार्यक्रमाला सुरुवात केली. अमितच्या या गाण्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर हर्षदीप कौर, भानू प्रताप सिंग यांनी 'मनमर्जिया' या चित्रपटातील गाणी सादर केली, उपस्थितांनी या गाण्यावर चांगलाच ताल धरला. 

मनमर्जियां या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चनतापसी पन्नूविकी कौशल नागपूरमध्ये दाखल झाले असून लोकमतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेल्या सूत्रसंचालकाने आप में से कितने लोगो ने प्यार किया है... आपको दिखाते है क्या है प्यार म्हणत सगळयांना मनमर्जियां चित्रपटाचा ट्रेलर दाखवला. उपस्थितांनी हा ट्रेलर पाहिल्यानंतर टाळ्यांचा गडगडाट केला. याच दरम्यान विकीने ऑडियन्स मधूनच ग्रँड एन्ट्री घेतली. आणि शानदार नृत्य सादर केले. विकीने नृत्य झाल्यावर नागपूरकरांशी सवांद साधला. विशेष म्हणजे, नागपूर कसं  काय, बरं आहे का म्हणत त्याने मराठीत सुरुवात केली. त्यानंतर तो म्हणाला, अशी गर्दी मी कधीच पहिली नाही... हे स्टेडीयम भरेल का याची मला काळजी होती पण आता पाय ठेवायला देखील जागा नाही आहे. मी खुश आहे, आय लव्ह यु नागपूर. 

मनमर्जियां या चित्रपटाची संपूर्ण टीम लोकमतच्या इव्हेंट मध्ये आली असून नागपूरकरांनी एकच गर्दी केली आहे. अभिषेक बच्चनतापसी पन्नूविकी कौशल यांना पाहण्यासाठी जणू नागपूरची तरुणाई एकत्र आली आहे. खचाखच भरलेल्या मनकापूर इनडोअर स्टेडियम मधील गर्दीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे.

Web Title: abhishek bachchan met Aishwarya at the time of manmarziyan promotion in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.