​ अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला सोडून कॅटरिना कैफला म्हटले ‘आय लव्ह यू’! वाचा, नेमके काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 05:42 AM2018-02-11T05:42:24+5:302018-02-11T11:12:24+5:30

होय, वाचता ते खरे आहे. ऐश्वर्या रायला सोडून अभिषेक बच्चन सध्या कॅटरिना कैफच्या प्रेमात वेडा झाला आहे. ऐश्वर्याला नाही ...

Abhishek Bachchan leaves Katrina Kaif with 'I Love You'! Read, what exactly is the matter !! | ​ अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला सोडून कॅटरिना कैफला म्हटले ‘आय लव्ह यू’! वाचा, नेमके काय आहे प्रकरण!!

​ अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला सोडून कॅटरिना कैफला म्हटले ‘आय लव्ह यू’! वाचा, नेमके काय आहे प्रकरण!!

googlenewsNext
य, वाचता ते खरे आहे. ऐश्वर्या रायला सोडून अभिषेक बच्चन सध्या कॅटरिना कैफच्या प्रेमात वेडा झाला आहे. ऐश्वर्याला नाही तर अभिषेक सध्या कॅटरिनाला ‘आय लव्ह यू’ म्हणतो आहे. तेही, सोशल मीडियावर अगदी छातीठोकपणे. आता हा सगळा काय मामला आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मामला गंभीर आहे. होय, ट्विटर अकाऊंटनंतर अभिषेकचे इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक झाले आहे. अभिषेकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला गेला आहे. यात अभिषेक, बिग बी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू एकत्र दिसताहेत. आणखी एक फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘आय लव्ह यू कॅटरिना कैफ’ असे लिहिले आहे. त्याच्या अकाऊंटवर पॅलेस्टाईनचा झेंडाही पोस्ट करण्यात आला आहे. अभिषेकचे अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच, हे सगळे फोटो लगेच हटवण्यात आले आहेत.



ALSO READ : पाकिस्तानच्या सायबर आर्मीने केले अभिषेक बच्चनचे ट्विटर अकाउंट हॅक!

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींचे सोशल अकाऊंट हॅक होत असल्याच्या बातम्या आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. विदेशात अनुपम यांना हे कळताच, त्यांनी लगेच मीडियाला ही माहिती दिली होती. अनुपम यांच्यानंतर काल-परवा अभिषेकचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. पाकिस्तान समर्थक तुर्कस्थानच्ी सायबर आर्मी ‘अयिल्दिज टिम’ने अभिषेकचे ट्विटर अकाऊंट हॅक केले होते.  अभिषेकचे अकाउंट हॅक  होताच, त्याच्या अकाउंटला असलेला निळ्या रंगाचा मार्क काढण्यात आला, तसेच कव्हर फोटोवर एक मिसाइल बनविण्यात आले. ज्यावर सांकेतिक शब्दांमध्ये अयिल्दिज टिम असे लिहिले आहे. 
ट्विटरने  याप्रकरणी तातडीची पाऊले उचलली होती. आमची टीम काही भारतीय अकाउंटधारकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ज्यांचे अकाउंट हॅक झाले आहेत, अशा अकाउंटधारकांना आम्ही याबाबतची माहिती देत आहोत.  भडकाविणारे किंवा चेतावणी संदेश असलेल्या खात्यावर जाणे शक्यतो टाळावे, असे ट्विटरने म्हटले होते.

Web Title: Abhishek Bachchan leaves Katrina Kaif with 'I Love You'! Read, what exactly is the matter !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.