आयुष शर्मा या कारणामुळे करणार नाही कॅटरिनासोबत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 04:23 PM2018-09-15T16:23:39+5:302018-09-15T19:00:00+5:30

आयुषचा लव्हरात्री हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कारण आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा पती असून या चित्रपटाद्वारे सलमान त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

Aayush Sharma won’t work with Katrina Kaif for some obvious reasons | आयुष शर्मा या कारणामुळे करणार नाही कॅटरिनासोबत काम

आयुष शर्मा या कारणामुळे करणार नाही कॅटरिनासोबत काम

googlenewsNext

आयुष शर्माचा लव्हरात्री हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या नावामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असे एका याचिकाकर्त्यांचे म्हणणे असून त्याने या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटात वरिना हुसैन आयुषच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

आयुषचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कारण आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा पती असून या चित्रपटाद्वारे सलमान त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. त्याच्यासोबत वरिनाचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे. लव्हरात्री या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सलमान खान करत आहे. आयुषचा हा चित्रपट हिट व्हावा यासाठी त्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. आयुषच्या डोक्यावर सलमानचा हात असल्याने बॉलिवूडमधील त्याचे करियर उज्जवल असल्याचे म्हटले जात आहे. 

लव्हरात्री या चित्रपटानंतर आयुष कोणत्या चित्रपटात काम करणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. लव्हरात्री या चित्रपटानंतर तो लवकरच त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचे काम करायला सुरुवात करणार आहे अशी चर्चा आहे. या चित्रपटात कॅटरिना त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. पण तिने त्याच्यासोबत काम करायला नकार दिला अशी चर्चा आहे. पण याबाबत दोघांनीही मौन राखणेच पसंत केले होते. पण आयुषने नुकत्याच दिलेल्या एका प्रतिक्रियेवरून कॅटने खरंच आयुषसोबत काम करण्यास नकार दिला होता अशी चर्चा आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कॅटरिनासोबत कधी काम करणार असे आयुषला विचारण्यात आले होते, त्यावर काही कारणांमुळे हे कधीच शक्य होणार नाही असे त्याने उत्तर दिले आहे. 

लव्हरात्री या चित्रपटात प्रेक्षकांना गुजरातमधील एका सणाच्या दरम्यानची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. गरबा या खेळामुळे त्या दोघांमध्ये निर्माण झालेले ट्युनिंग प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने गरबा हा या चित्रपटाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी आयुष आणि वरिनाने खास गरबा शिकला आहे. 

Web Title: Aayush Sharma won’t work with Katrina Kaif for some obvious reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.