'Aashiqui' fame Rahul Khote enters BJP; Rahul Gandhi's Competitor! | ‘आशिकी’ फेम राहुल रॉयचा भाजपात प्रवेश; ट्विटरवर म्हटले, ‘राहुल गांधींचा कॉम्पिटीटर!

९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘आशिकी’मधून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता राहुल रॉय आता राजकारणाच्या पटलावर नशीब आजमावणार आहे. होय, राहुल रॉयने भाजपात प्रवेश केला असून, पुढील काळात निवडणुका लढविण्याचा त्याचा मनोदय आहे. दिल्ली भाजपा नेता तथा खासदार विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्याने भाजप पक्षात प्रवेश केला. गेल्या बºयाच काळापासून राहुल पडद्यावरून गायब आहे. ‘आशिकी’ चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळूनही त्याला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळेच त्याने आता राजकारणात नवी इनिंग सुरू केली आहे. 

दरम्यान, भाजपात प्रवेश केल्यानंतर राहुल रायने सांगितले की, ‘भाजपात प्रवेश करण्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह आहेत. नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशासाठी काम करीत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच मी त्यांच्या पक्षासोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे.’ दरम्यान, दिल्लीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी दिल्लीतील भाजपाचे स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते. राहुल रॉय पक्षात आल्याने स्थानिक नेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे बघावयास मिळाले. दरम्यान, ‘आशिकी’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या राहुल रॉयने बºयाचशा बॉलिवूडपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर छोट्या पडद्यावरही त्याने नशिब आजमावले. बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला आहे. बिग बॉसच्या पहिल्याच सीजनमध्ये सहभागी होताना तो या शोचा विनर राहिला आहे. राहुलने भाजपात प्रवेश करताच तो ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. एका युजरने म्हटले की, अचानकच राहुल रॉयला भाजपात प्रवेश देवून भाजपावाल्यांनी राहुल गांधीला कॉम्पिटीटर आणला आहे. 
Web Title: 'Aashiqui' fame Rahul Khote enters BJP; Rahul Gandhi's Competitor!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.