Aamir Khan's lal singh chadha movie is written by atul kulkarni | आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटासाठी अतुल कुलकर्णीने दिले हे खास योगदान
आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटासाठी अतुल कुलकर्णीने दिले हे खास योगदान

ठळक मुद्देआमिरच्या या नव्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचे लेखन मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून मी ‘फॉरेस्ट गम्प’या चित्रपटाचे हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत होता. या चित्रपटाबाबत मी अतुल कुलकर्णीसोबत रंग दे बसंती या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चर्चा केली होती.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ दणकून आपटला होता. पण तरीही आमिर खानचा आगामी चित्रपट कोणता असेल, याबद्दलची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आमिरने त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव असेल, ‘लाल सिंग चड्ढा’.


आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा आगामी चित्रपट एका ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असेल. या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे नाव आहे, ‘फॉरेस्ट गम्प’. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ऑस्कर जिंकला होता. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे. आणखी एक खास सरप्राईज म्हणजे, यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे.

आज आमिरने मीडियासोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. माझ्या प्रॉडक्शन हाऊसने ‘फॉरेस्ट गम्प’चे हक्क खरेदी केले आहेत. लवकरच या चित्रपटावर काम सुरू होईल. या चित्रपटातील भूमिकेसाठी मला २० किलो वजन कमी करायचे आहे. येत्या सहा महिन्यांत मी यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आमिरने यावेळी सांगितले.

आमिरच्या या नव्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचे लेखन मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने केले आहे. याविषयी आमिरने सांगितले, गेल्या आठ वर्षांपासून मी ‘फॉरेस्ट गम्प’या चित्रपटाचे हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत होता. या चित्रपटाबाबत मी अतुल कुलकर्णीसोबत रंग दे बसंती या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चर्चा केली होती. 

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम केली होती.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. 

English summary :
Aamir khan's 'Lal Singh Chadha' will be the remake of an Oscar winning movie 'Forrest Gump'. The film, which was released in 1994, won the Oscars. The film is written by Marathi actor Atul Kulkarni.


Web Title: Aamir Khan's lal singh chadha movie is written by atul kulkarni
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.