Aamir Khan's Fajita; Shabana Azmi said Akhtar's daughter! | ​अशी झाली आमिर खानची फजिती; शबाना आझमींना म्हटले जावेद अख्तरची मुलगी!

मि. परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा कधी कधी चुकतो. प्रत्येक गोष्ट तोलून-मोलून करणाऱ्या आमिरची करण जोहरच्या शोवर चांगलीच फजिती झाली. जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आझमीला त्याने त्यांची मुलगी म्हटले आणि त्याच्यावर दातात जीभ पकडण्याची वेळ आली.

करण जोहर होस्ट करणाऱ्या सेलिब्रेटी चॅट शोवर आमिर त्याच्या ‘दंगल’मधील मुलींसोबत आला होता. बॉलीवूड कलाकारांना अडचणीत आणणाऱ्या क्वीझ राऊंडमध्ये आमिरकडून ही चूक झाली. करणने त्याला जावेद अख्तर आणि पहिली पत्नी जान निसार यांच्या मुलांची नावे काय असे विचारल्यावर गडबडीमध्ये आमिरने फरहान किंवा झोया अख्तर यांचे नाव घेण्याऐवजी शबाना आझमींचे नाव घेतले आणि एकच हशा पिकला. शबाना जावेद अख्तर यांच्या पत्नी आहेत.

आमिरच्या या उत्तरावर उपस्थित कोणालाच हसू रोखता आले नाही.  ‘आपण हे काय बोलून बसलो’ या विचारत तो स्वत:देखील थोडा वेळाकरिता गोंधळात सापडला. आमिरच्या या ‘स्लीप आॅफ टंग मोमेंट’मुळे आलिया भट्टची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

                                    Aamir, Fatima Sana Shaikh and Sanya Malhotra with Karan Johar
                                     आलिया भट्ट मोमेंट : आमिर खान त्याच्या ‘दंगल’मधील मुलींसोबत करण जोहरच्या शोवर.

याच शोवर आलियाने भारताचे राष्ट्रपती कोण या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले होते. तेव्हापासून आजतागायत तिच्या सामान्य ज्ञानाची खिल्ली उडवली जातेय. आता आमिरनेसुद्धा तशीच चूक केली म्हटल्यावर नेटिझन्स यावर कसे रिअ‍ॅक्ट होतात हे पाहायचेय. पण त्याआधी लिजेंडरी अभिनेत्री शबाना आझमी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या ‘दंगल’ सिनेमाच्यानिमित्ताने आमिर ‘कॉफी विथ करण’मध्ये सहकलाकार फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रासह आला होता. भल्याभल्यांना वादात अडकवणाऱ्या या शोचा आमिरही शिकार झाला. विशेष म्हणजे त्याने झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’साठी सुत्रधार म्हणून कुत्र्याला आवाज दिला आहे.

बरं सार्वजनिक कार्यक्रमात अशा चुकीमुळे नाचक्की होण्याची त्याची ही काही पहिली वेळ नाही. प्रसिद्ध इंग्लिश अभिनेते इयान मॅक्केलन यांच्याशी ‘मामी’ महोत्सवात संवाद साधतेवेळेसही आमिरकडून चूक झाली होती.
Web Title: Aamir Khan's Fajita; Shabana Azmi said Akhtar's daughter!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.