करण जोहरसोबत पहिल्यांदा काम करतोय आमिर खान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 01:50 PM2018-07-10T13:50:00+5:302018-07-10T13:54:36+5:30

बॉलिवूडचा मी. परफेक्शनिस्ट आमिर खानला लवकरच दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. पहिल्यांदा आमिर करण जोहरच्या सिनेमात काम करणार आहे.

Aamir Khan is working with Karan Johar for the first time | करण जोहरसोबत पहिल्यांदा काम करतोय आमिर खान

करण जोहरसोबत पहिल्यांदा काम करतोय आमिर खान

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्यांदा आमिर करण जोहरच्या सिनेमात काम करणार आहे

बॉलिवूडचा मी. परफेक्शनिस्ट आमिर खानला लवकरच दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. पहिल्यांदा आमिर करण जोहरच्या सिनेमात काम करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार आमिर लवकरच ओशोच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याआधी आमिरने दंगल या बायोपिकमध्ये काम केले आहे. 


पिंकविलाच्या रिपोर्टनुसार ओशोच्या बायोपिकमध्ये आमिर दिसणार आहे. यासिनेमाच्या निर्मिती करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन आणि आमिर खानचे प्रोडक्शनचे एकत्र येऊन करते आहे. रिपोर्टनुसार यासिनेमात काम करण्यासाठी. आमिरने हा सिनेमा करण्यासाठी होकार दिला आहे आणि लवकरच तो याची तयारी देखील सुरु करणार आहे. तो हा सिनेमा करण्यासाठी खूपच उत्सुक आहे.  


आमिर खानच्या सध्याच्या सिनेमाबाबत बोलायचे झाले तर तो आगामी सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्टनुसार 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्यानंतर या बायोपिकची घोषणा होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार शकुन बत्रा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे मात्र ऑफिशयली या अनाउंसमेंट अजून करण्यात आलेली नाही.  विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या अ‍ॅडव्हेंचर-अ‍ॅक्शन ड्रामामध्ये अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा १९३९ साली आलेल्या ‘कन्फेशन्स आॅफ ए ठग’ या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.  संबंधित कादंबरीत आमिर अली नावाचा एक ठग असतो आणि तो इंग्रजांच्या नाकीनऊ आणतो. तो एक पठाण आहे. इस्माईल नावाचा एक मोठा ठग त्याला जवळ करतो आणि मुलासारखे वाढवतो. आमिर अली त्याचे मित्र बद्रीनाथ आणि पीर खानसोबत ठगबाजी सुरू करतो. यात गणेशा आणि चीता त्याची मदत करतात. नंतर आमिर अली मोठा जमीनदार बनतो, असे याचे कथानक आहे. कादंबरीतील आमिर अलीचे हेच पात्र आमिर साकारतो आहे.

Web Title: Aamir Khan is working with Karan Johar for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.