Aamir Khan was once again 'silent love'! Aamir is telling the next story !! | आमिर खानला एकदा नाही तर तिनदा झाले होते ‘ silent love ’! पुढची कहाणी सांगतोय खुद्द आमिर!!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान  याच्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातील ‘पहला नशा पहला खुमार’ हे गाणे तुम्हाला आठवत असेलच. काल व्हॅलेन्टाईन डेला आमिर अख्खा दिवस हेच गाणे गुणगुणत होता. स्वत: आमिरने  ट्विटरवर याचा उल्लेख केला आहे. सोबतच आमिरने एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात आमिरने त्याच्या ‘पहिला नशा’बद्दल सांगितलेयं.
 ALSO READ : ​ आमिर खान सोबतचा ‘हा’ फोटो शेअर करून फसली कॅटरिना कैफ ! लोकांनी घेतली मजा!! 

होय, आमिरने ट्विटरवर फेसबुकची एक लिंक शेअर केली आहे. यात एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओत आमिरने त्याच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले आहे. ‘मी १० वर्षांचा असताना एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. खूप कमी लोकांना हे माहित आहे. मी टेनिस क्लासला जायचो. त्यावेळी टेनिस कोचिंगमध्ये खूप मोठा ग्रूप होता. आम्ही सगळे १० वर्षांच्या वयोगटातील ४०-५० मुलं- मुली होतो. याच ग्रूपमध्ये एक मुलगी होती. तिला पाहताच मी भान हरपलो होतो. तिला पहिल्यांदा पाहिले आणि मी तिच्या प्रेमात वेडा झालो. म्हणजे, दिवसरात्र मी केवळ तिच्या अन् तिच्याबद्दल विचार करायचो. ‘पहला नशा...’ या गाण्यातील ‘उडता ही फिरूं इन हवाओं में कही...’ या ओळीसारखी माझी अवस्था होती. ती १० वर्षांची होती आणि कमालीची सुंदर होती. तिला इम्प्रेस करण्यासाठी मी नाही नाही ते उपद्व्याप केलेत. पण अखेरपर्यंत तिला सांगण्याची हिंमत मात्र झाली नाही. क्लासमध्ये सर्वात आधी पोहोचणारा आणि सर्वात उशीरा निघणारा मी होतो. तिला इम्प्रेस करण्याच्या नादात केवळ आणि केवळ माझा गेम चांगला झाला. बाकी माझ्या मनातले मी तिला कधीच सांगू शकलो नाही. पुढे चार वर्षांत ती तिच्या कुटुंबासोबत निघून गेली. ते ‘सायलेंट लव्ह’ होते. जे कायम अधूरे राहिले. इंटरेस्टिंग म्हणजे, मला दोन-तीनदा असे प्रेम झाले. पण प्रेमात मी फार लकी नव्हतो. पण आता माझ्यासारखा नशीबवान कुणीच नाही. ज्यांना आयुष्यात प्रेम मिळाले नाही, अशा लोकांबद्दल मी कमालीचा भावूक होतो. अशा सगळ्यांसाठी माझ्या मनात एक खास जागा आहे, असे आमिरने या व्हिडिओत सांगितले.
Web Title: Aamir Khan was once again 'silent love'! Aamir is telling the next story !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.