बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करतोय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. सध्या आमिर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण वाढदिवस म्हटल्यावर तो कुटुंबासोबत साजरा व्हावा, असाच आमिरचा प्रयत्न असतो. त्यामुळे आजचा वाढदिवस साजरा करण्यासाठीही आमिर जोधपूरवरून मुंबईला परतला आणि मुंबई विमानतळावर आमिरला त्याच्या वाढदिवसाची सगळ्यात सुंदर भेट मिळाली. होय, आमिरला रिसीव्ह करायला पत्नी किरण राव आली होती. आमिरला पाहून किरण राव इतकी भावूक झाली की, तिने त्याला कडकडून मिठी मारली.या मिठीत आमिरबद्दलची तिची ओढ स्पष्ट दिसली. या मिठीनंतर आमिर व किरणची जी काही नजरानजर झाली, त्याबद्दल लिहायला तर शब्दही कमी पडतील.दोघांनीही एकमेकांना किती मिस केले, हेच या नजरेतून दिसले.पुढे किरण आणि आमिरने एकमेकांचे चुंबन घेत प्रेम व्यक्त केले. मुंबईत पाऊल ठेवल्या ठेवल्या यापेक्षा सुंदर आणि अनमोल गिफ्ट आमिरसाठी कुठले बरे असू शकेल?
किरणकडून मिळालेली ही गोड भेट स्वीकारून आमिर घराकडे रवाना झाला. यानंतर दरवर्षीप्रमाणे मीडिया व चाहत्यांसोबत त्याने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी किरणही आमिरसोबत होती. सन 2002 मध्ये ‘लगान’च्या शूटदरम्यान आमिर व किरण पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. आमिर विवाहीत होता पण किरणची हुशारी पाहून तो तिच्यावर कमालीचा भाळला. या चित्रपटात किरण शामिन देसाई यांची असिस्टंट होती. पुढे किरणही आमिरच्या प्रेमात पडली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. 2002 मध्ये आमिरने पहिली पत्नी रीनाला घटस्फोट दिला आणि 2005 मध्ये आमिरने किरणसोबत दुसरा संसार थाटला.  आमिर खानची पत्नी किरण रावच्या मते आमिरला ईटिंग डिसआॅर्डर असून त्याला आंघोळ करण्याचा प्रचंड कंटाळा आहे.  

ALSO READ : Birthday Special : -​अन् किरण रावसाठी आमिर खानने सोडले पहिले प्रेम!
Web Title: Aamir Khan receives birthday gift from wife Kiran Raut; You see too !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.