Aamir Khan to promote promotion of 'This' film | 'या' चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आमिर खानने कसली कंबर, सप्टेबरपासून लागणार प्रमोशनच्या कामाला

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनपासून ते स्क्रिप्टिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत सतर्क असतो. प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर देखील त्याचे लक्ष असते. त्यामुळेच त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट जातो. यशराज बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या आमिरच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ची शूटिंग आता जवळपास पूर्ण झाली आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु झाले आहे.    

मिळालेल्या माहितीनुसार आमिर खान लवकरच 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या टीमसोबत मिटिंग करणार आहे आणि चित्रपटाच्या प्रमोशन संदर्भातील स्ट्रेटजी तयार करणार आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, आमिर खान लवकरच  'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या टीमसोबत मिटिंग करणार आहे आणि यात प्रेक्षकांनासमोर सगळ्यात आधी कोणते पात्रचे प्रमोशन करणार याबाबत चर्चा करणार आहे. आमिर खानशिवाय या चित्रपाट अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत.या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात आमीर खान आणि महानायक अमिताभ बच्चन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करीत आहे. हा चित्रपट १९३९ साली आलेल्या ‘कन्फेशन्स आॅफ ए ठग’ या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. आमिर खान यात मुख्य भूमिकेत आहे. संबंधित कादंबरीत आमिर अली नावाचा एक ठग असतो आणि तो इंग्रजांच्या नाकीनऊ आणतो. तो एक पठाण आहे. इस्माईल नावाचा एक मोठा ठग त्याला जवळ करतो आणि मुलासारखे वाढवतो. आमिर अली त्याचे मित्र बद्रीनाथ आणि पीर खानसोबत ठगबाजी सुरू करतो. यात गणेशा आणि चीता त्याची मदत करतात. नंतर आमिर अली मोठा जमीनदार बनतो, असे याचे कथानक आहे. कादंबरीतील आमिर अलीचे हेच पात्र आमिर साकारतो आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून चित्रपटाची टीम जोरदार प्रमोशनला लागणार आहेत.  

ALSO READ :  आमिर खानच्या 'महाभारत'मध्ये सलमान खान साकारणार 'ही' भूमिका

Web Title: Aamir Khan to promote promotion of 'This' film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.