Aamir Khan once again cried! Reason was due !! | ​पुन्हा एकदा रडला आमिर खान! कारण होते रेखा!!

होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याला पुन्हा एकदा अश्रू अनावर झालेत. संवेदनशील अभिनेता अशी आमिरची ओळख आहे. याच संवदेनशील स्वभावामुळे आमिरला अनेकदा अश्रू अनावर होतात. एखादा उत्कृष्ट चित्रपट बघितला तरी तो भावूक होतो आणि त्याचे डोळे पाणावतात. याही वेळी आमिरचे डोळे पाणावलेत. अर्थात यावेळी कुठला चित्रपट नाही तर कारण होते अभिनेत्री रेखा. रेखाने आमिरला एक भेटवस्तू दिली आणि ती पाहून आमिर स्वत:चे अश्रू थांबवू शकला नाही. ही भेटवस्तू काय होती, हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक असालच. तुमच्या संयमाची फार परीक्षा न घेता, ही भेट वस्तू काय होती, हे आम्ही तुम्हाला सांगतो. रेखाने आमिरला दिलेली ही भेटवस्तू होती एक पत्र. तेही रेखाच्या स्वत:च्या हस्ताक्षरातलं.अलीकडे आमिरने ‘दंगल’ची सक्सेस पार्टी दिली, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. या पार्टीत सदाबहार रेखानेही हजेरी लावली. खरे तर रेखा पार्ट्यांना जात नाही. पण आमिर खानच्या पार्टीला ती आली. याठिकाणी तिने आमिरला हे पत्र दिले. या पत्रात रेखाने ‘दंगल’मधील आमिरच्या अभिनयाची मनापासून प्रशंसा केली होती. रेखाने स्वत:च्या हाताने हे पत्र लिहिले होते. हे पत्र आणि त्यातील रेखाचे शब्द वाचून आमिरच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सूत्रांची मानाल तर आमिर त्याक्षणी प्रचंड भावूक झाला.  ‘दंगल’ हा सिनेमाच नाही तर माझ्यासाठी हे पत्र सुद्धा अनमोल आहे. मी हे पत्र आयुष्यभर सांभाळून ठेवेल, अशा शब्दांत आमिरने रेखाचे आभार मानले.

ALSO READ: आमिर खान म्हणतो, मी box-office king ​नाही; मी केवळ ‘ Kiran’s king’
​‘दंगल’च्या दिग्दर्शकाचा पुढचा चित्रपट कोणता?

‘दंगल’ या सिनेमातील आमिरच्या अभिनयाचे सध्या प्रचंड कौतुक होत आहे. बॉक्सआॅफिसवरही हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. ३८५ कोटींची कमाई करत हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला.
Web Title: Aamir Khan once again cried! Reason was due !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.