आमिर खानला मिळाली परवानगी! आता बनवणार ‘स्वप्नातले घर’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 11:29 AM2018-08-08T11:29:08+5:302018-08-08T11:29:44+5:30

मुंबईच्या पाली हिल्स भागातील मरीना बिल्डिंगमधील चार वेगवेगळे फ्लॅट एका जिन्याने जोडण्याचे काम आमिर खानने सुरू केले होते. पण आमिरच्या एका शेजाऱ्याने याबाबत महापालिकेत तक्रार दाखल केली होती.

 Aamir Khan got permission for his dream house !! | आमिर खानला मिळाली परवानगी! आता बनवणार ‘स्वप्नातले घर’!!

आमिर खानला मिळाली परवानगी! आता बनवणार ‘स्वप्नातले घर’!!

googlenewsNext

प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. पण तरीही स्वप्नातल्या घराची स्वप्नं रंगवणे थांबत नाही. सुपरस्टार आमिर खान यानेही स्वप्नातल्या घराचे एक स्वप्न पाहिले होते आणि आता या स्वप्नात रंग भरण्याची वेळ आलीय. होय, आमिरला मुंबई महापालिकेकडून या स्वप्नातल्या घरासाठी मंजूरी मिळाली आहे.
मुंबईच्या पाली हिल्स भागातील मरीना बिल्डिंगमधील चार वेगवेगळे फ्लॅट एका जिन्याने जोडण्याचे काम आमिर खानने सुरू केले होते. पण आमिरच्या एका शेजाऱ्याने याबाबत महापालिकेत तक्रार दाखल केली होती. या फ्लॅटमध्ये आमिरला अनेक बदल करायचे होते. पण शेजा-याने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेने या बांधकामावर स्थगिती आणली होती. यानंतर आमिरचा आर्किटेक्चर अमित सप्रेने आयआयटी बॉम्बेने दिलेले पत्र मुंबई महापालिकेत जमा केले. या नव्या बांधकामामुळे इमारतीच्या सुरक्षेला कुठलाही धोका नाही, अशा आशयाच्या या पत्रानंतर आमिरला आपले ड्रिम हाऊस साकारण्याची परवानगी मिळाली.
मरीना बिल्डिंगमध्ये आमिरचे चार फ्लॅट आहेत. तळमजल्यात़, पहिल्या माळ्यावर दोन आणि चौथ्या माळ्यावर एक़. या चारही फ्लॅटला एका जीनाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्याची आमिरची इच्छा आहे.

आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यात आमिरसह अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title:  Aamir Khan got permission for his dream house !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.