Aamir Khan became the favorite of three billion viewers, but how? Read detailed! | तीन अब्ज प्रेक्षकांचा फेव्हरेट बनला आमिर खान, पण कसा? वाचा सविस्तर!

गेल्या काही वर्षांत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याने हे सिद्ध केले की, त्याची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहे. त्यामुळेच भारताबरोबर चीनमध्येही त्याच्या चाहत्यांची संख्या विलक्षण आहे. चीनमध्ये १.४ अब्ज तर भारतात १.३५ अब्ज चाहत्यांची संख्या असलेला आमिर जगातील सुपरस्टार बनला आहे. आमिरच्या गेल्या तिन्ही ‘पीके’ (२०१४), ‘दंगल’ (२०१६) आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ (२०१७) या चित्रपटांनी जगभरात अशी काही कमाई केली की, त्याची लोकप्रियता त्यावरून अधोरेखित झाली आहे. सर्वाधिक कमाई करणाºया पहिल्या पाच चित्रपटांमध्ये त्याच्या या चित्रपटांचा समावेश झाला आहे. 

‘दंगल’ने १९०८ कोटींची आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ने ८७४ कोटींची कमाई करीत चीनच्या बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली. यावरून चीनमध्ये आमिरबद्दल असलेली क्रेझ स्पष्ट होते. वास्तविक चिनी अभिनेत्यांच्या तुलनेत आमिरबद्दल तेथील प्रेक्षकांमध्ये अधिक क्रेझ आहे. त्यामुळे चीनमध्ये त्याचे जबरदस्त स्टारडम आहेत. शेजारी देशाकडून मिळत असलेल्या जबरदस्त प्रेमाबद्दल बोलताना आमिर खानने सांगितले की, ‘चीनमध्ये माझ्याबद्दल लोकांमध्ये असलेली लोकप्रियता हा केवळ एक अपघात आहे. बºयाच लोकांना माहिती नाही की, २००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट चीनमध्ये पायरेसीच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला होता. ‘पीके’ आणि ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोच्या माध्यमातून त्यांनी मला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर चीनमध्ये ‘दंगल’ प्रदर्शित झाला. तेथील जनता मला आणि माझ्या कामाबद्दल जाणून होती. 

पुढे बोलताना आमिरने म्हटले की, त्याव्यतिरिक्त चीनमध्ये चित्रपटाने चांगला व्यवसाय करण्याचे दुसरे कारण म्हणजे तेथील स्क्रीनची संख्या आहे. एकीकडे भारतात थिएटरची संख्या पाच हजार आहे. परंतु चीनमध्ये ही संख्या ४५,००० इतकी आहे. भलेही दोन्ही देशांच्या लोकसंख्येत फारसा फरक नाही. (जवळपास १.३५ अब्ज भारत आणि १.४ अब्ज चीन) ‘सीक्रेट सुपरस्टार’मध्ये माझा कॅमिओ रोल आहे. अशात चीनमध्ये या चित्रपटाला ११,००० हजार स्क्रिन मिळाल्या. जेव्हा या चित्रपटाला जगातील सर्वात मोठा सुपरस्टार असे टायटल देण्यात आले तेव्हा त्याचा फायदा प्रेक्षकांना झाला. जर तुम्ही दोन्ही देशांमध्ये लोकप्रिय आहात तेव्हा तीन अब्ज लोक तुमच्यावर प्रेम करतात, जे निम्या जगाच्या समान आहे. 

अमेरिकेत जवळपास ६५० मिलियन लोक आहेत. संपूर्ण युरोपला मिळून जवळपास ७५० मिलियन लोक आहेत. अशात भारत आणि चीनचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांच्याशी कोणीही तुलना करू शकत नाही. लोकसंख्येच्या बाबतीत पश्चिम आपल्याला पराभूत करू शकत नाही. एकूण काय तर आमिर खानने मनोरंजनाच्या बाबतीत भारत आणि चीनला एकमेकांच्या अधिक जवळ आणले आहे. गेल्या काही वर्षांत आमिर खान एकमेव असा अभिनेता आहे, ज्याला चीनमध्ये जबरदस्त प्रेम मिळाले आहे. 
Web Title: Aamir Khan became the favorite of three billion viewers, but how? Read detailed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.