आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:15 PM2019-07-16T17:15:08+5:302019-07-16T17:18:17+5:30

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार असून या चित्रपटावर सध्या तो चांगलीच मेहनत घेत आहे.

Aamir Khan and Kareena Kapoor Khan to have four different looks in Lal Singh Chaddha | आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

googlenewsNext
ठळक मुद्देलाल सिंग चड्ढा या चित्रपटात पाच दशकांचा काळ दाखवला जाणार आहे. या वेगवेगळ्या काळात करिना आणि आमिर यांच्या कपड्यांची पॅटर्न, हेअर स्टाईल सगळे काही वेगळे असणार आहे.

आमिर खानने काही महिन्यांपूर्वी म्हणजेच त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. 

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटासाठी तो तब्बल २० किलो वजन कमी करणार आहे. आमिरच्या प्रोडक्शन हाऊसने ‘फॉरेस्ट गम्प’ चे हक्क खरेदी केले असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचे लेखन अभिनेता अतुल कुलकर्णी करत आहे. या चित्रपटात करिना कपूर आमिरच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात या दोघांचेही तीन-चार लूक असणार आहेत. 



 

लाल सिंग चड्ढा या चित्रपटातील आमिर आणि करिनाच्या लूकवर दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि आमिर खान गेल्या कित्येक महिन्यांपासून काम करत आहेत. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात पाच दशकांचा काळ दाखवला जाणार आहे. या वेगवेगळ्या काळात करिना आणि आमिर यांच्या कपड्यांची पॅटर्न, हेअर स्टाईल सगळे काही वेगळे असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी त्यांची लूक टेस्ट घेतली जाणार आहे. 

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

 

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. 

 

Web Title: Aamir Khan and Kareena Kapoor Khan to have four different looks in Lal Singh Chaddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.