Aaliya Bhatt, Ranbir Kapoor's 'Fan', and 'Hey' sing! | ​ रणबीर कपूरची ‘फॅन’ झाली आलिया भट्ट, वारंवार ऐकतेय ‘हे’ एकच गाणे!!

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा रोमान्स सध्या बॉलिवूड गोटात चर्चेचा विषय ठरतो आहे. दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चा जोरावर असतानाच रणबीरच्या कुटुंबीयांशी आलियाची जवळीक वाढते आहे. काल-परवा आलिया रणबीर, रणबीरची मॉम नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा यांच्यासोबत डिनर एन्जॉय करताना दिसली. ताजी बातमी म्हणजे, आलिया तिचा कथित बॉयफ्रेन्ड रणबीरच्या चित्रपटाच्या एका गाण्याची ‘दीवानी’ झाली आहे. होय, रणबीरचा आगामी चित्रपट ‘संजू’चे नवे  गाणे ‘कर हर मैदान फतह...’ तुम्ही ऐकले असेलच. याच गाण्याने आलियाला जणू वेड लावले आहे. आलिया वारंवार हे एकचं गाणे ऐकतेयं. आता तुम्ही म्हणाल, हे आम्हाला कसे ठाऊक? तर स्वत: आलियानेच ही माहिती दिली आहे. आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या म्युजिक प्लेअरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात रणबीर कपूरच्या ‘संजू’मधील ‘कर हर मैदान फतह’ प्ले होतेयं. हा स्क्रिनशॉट शेअर करताना आलियाने ‘आॅनरिपीट’ असे कॅप्शनमध्ये लिहिलेय. हे कॅप्शन बरेच काही सांगणारे आहे. तूर्तास आलिया व रणबीर आपल्या रिलेशनशिप स्टेट्सबाबत काहीही बोललेले नाहीत. पण या अशा छोट्या गोष्टीतून त्यांची ‘स्टोरी’  ‘प्ले’ मोडमध्ये असल्याचे दिसतेय.अलीकडे एका मुलाखतीत रणबीर आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलला होता.  ‘हे सध्या खूपच नवनवीन आहे. त्यामुळे मला यावर फारचे बोलायचे नाही. यास (नात्याला) आणखी काहीकाळ हवा आहे. काहीतरी स्पेस हवी आहे. एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आलिया खूपच चांगली आहे. जेव्हा मी तिचे काम बघतो, तिचा अभिनय बघतो किंवा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेतो तेव्हा ती खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे मला दिसते. दोघांविषयी सांगायचे झाल्यास, आमच्यासाठी हे सर्व नवे आहे. त्यामुळे ते आणखी पुढे जायला हवे,’असे तो म्हणाला होता.

ALSO READ : रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत डिनर डेटवर पोहोचली आलिया भट्ट!!

या अगोदर एका मुलाखतीत रणबीरने आलियासोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते की, ‘होय, एक मुलगा म्हणून मला तिच्यावर क्रश आहे, ’ असे तो म्हणाला होता.
दरम्यान, हे दोघे पहिल्यांदा ‘ब्रह्मास्त्र’मध्ये बघावयास मिळणार आहे. चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. उपलब्ध माहितीनुसार, ब्रह्मास्त्र एक नव्हे तर तीन भागात प्रदर्शित होणार आहे. त्याचा पहिला भाग १५ आॅगस्ट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.  
Web Title: Aaliya Bhatt, Ranbir Kapoor's 'Fan', and 'Hey' sing!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.