This 90-year-old actress now does a job in a company | 90 च्या दशकातील ही अभिनेत्री आता करते एका कंपनीमध्ये नोकरी

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, गेल्या काही वर्षांपासून मयुरी चित्रपटापासून दूर आहे. ती गुरगावमध्ये एक सामान्य आयुष्य जगत आहे, नुकतेच ती गुरगावमध्ये दिसून आली  तिच्या राहणीमानात आणि चेहऱ्यात इतका बदल झाला आहे की तिला ओळखता ही नाही आले. मयुरीला बॉलिवूडपासून दूर होण्याचे कारण विचारले असता तिने जे उत्तर दिले ते वाचून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल.


मयुरीने महेश भट्टच्या ''पापा कहते है" चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मयुरी रातोरात ती प्रसिद्धी झोतात आली. मयुरी विवाहित असून ती  गुरगावमध्ये नोकरी करते. आपल्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी एंटरटेनमेंट टाइम्सशी बोलताना तिने शेअर केल्या. 

मयुरी म्हणाली " मी एकूण १६ चित्रपट केले होते पण त्यातले अर्ध्याहून अधिक प्रदर्शित झालेच नाही, १९९९  हे वर्ष अभिनेत्रीसाठी फारसे काही चांगले नव्हते मला चित्रपटात झाडाच्या मागे पुढे डान्स करायला सांगायचे. मग मी पटकथा लिखाण आणि डॉक्युमेंटरीवर लक्षकेंद्रित  केले नंतर २००० मध्ये मी टीव्हीकडे वळली आणि काही वर्षानंतर लग्न करून मी यूएसला शिफ्ट झाली."

जेव्हा मयुरीला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार का? असे विचारले तेव्हा ती म्हणाली  "मला सेलेब्रिटीचे आयुष्य फारसे काही आवडले नाही मी माझ्या त्या काळाला मी आठवू इच्छित नाही. मी आतापर्यंत केलेले चित्रपट सगळेच खास चित्रपट होते पण मी आताच्या आयुष्यात खूप खुश आहे आणि चित्रपट करायचा विचार जरी केला तरी मी तेव्हाच काम करेल जेव्हा ते लोक मला फक्त विकेंडला काम करायला बोलावतील. 

मयुरी कांगो कित्येक वर्षात बॉलिवूडच्या एक ही पार्टीत दिसली नाही. ना कोणत्याही अॅवॉर्ड सेरेमनीमध्ये. ती बॉलिवूडपासून नेहमीच दूर राहिली. सध्या मयुरी गुरगाव मध्ये एका कंपनीची मॅनेजिंग डिरेक्टर ची धुरा सांभाळत आहे, मयुरी ने केलेल्या चित्रपटाच्या यादीत 'होगी प्यार की जीत','पापा कहते है', 'जितेंगे हम' हे लक्षात राहण्यासारखे चित्रपट आहेत.
Web Title: This 90-year-old actress now does a job in a company
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.