६३व्या जिओ फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान ते करण जोहर, इरफान खान, विद्या बालन हे आघाडीचे कलाकार सोहळ्यात पोहोचले होते. त्याचबरोबर मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब पटकाविणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाही अतिशय हटके अंदाजात सोहळ्यात दिसली. उर्वशीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसवरील काही फोटोज् तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले. परंतु काही यूजर्सला तिचा हा अंदाज अजिबातच आवडला नाही. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याचे झाले असे की, उर्वशीने एक असा फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये तिची बॉडी रिवील होताना दिसत आहे. उर्वशीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना लिहिले की, ‘फिल्म फेअर अवॉर्डमध्ये लेडी इन ब्लॅक’ यावेळी कॅप्शनमध्ये उर्वशीने ‘हेट स्टोरी-४’चाही उल्लेख केला. उर्वशीचे हे सर्व फोटो या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील आहेत. परंतु तिचे हे फोटो यूजर्सला भावले नसल्याने त्यांनी खिल्ली उडविण्यास सुरुवात केली. अनेक यूजर्सनी तर तिला चांगले कपडे घालण्याचा सल्ला दिला, तर काहींनी असे कपडे परिधान करून चित्रपटांमध्ये काम मिळत नसते असेही सांगितले. 

दरम्यान लवकरच उर्वशी रौतेला आगामी ‘हेस्ट स्टोरी-४’मध्ये झळकणार आहे. ती या चित्रपटावरून सध्या चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटात उर्वशीसोबत अभिनेता करण वाही बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट ९ मार्च २०१८ रोजी रिलीज होणार आहे. 
Web Title: 63rd Jio Filmfare Awards 2018: Urvashi Rautela's Looks Hot Style, 'Advice to wear good clothes given to the users'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.