5th day update: Know how is Dilip Kumar's condition! | 5th day update : ​जाणून घ्या, कशी आहे दिलीप कुमार यांची प्रकृती!

ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांच्यावर गत पाच दिवसांपासून लीलावती रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या काळजीने चाहते अस्वस्थ आहेत. ताज्या बातमीनुसार, दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. आज सकाळी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, दिलीप कुमार यांची प्रकृती हळूहळू सामान्य होत आहे. क्रेटिनाईनचे प्रमाणही कमी होते आहे. शिवाय ते युरिन पास करू शकत आहेत. ते ना व्हेंटिलेटरवर आहेत, ना त्यांना डायलिसीसची गरज आहे. अर्थात अद्यापही त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, दिलीप कुमार यांना रूग्णालयातून कधी सुट्टी मिळेल, हे तूर्तास सांगता येणार नाही. त्यांना आणखी काही दिवस रूग्णालयात राहावे लागू शकते.
या मेडिकल बुलेटिनआधी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे करण्यात आलेल्या एका ट्विटमधूनही त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली. ‘चोवीस तास डॉक्टरांची एक टीम दिलीपजींची काळजी घेत आहे. त्यामुळे दिलीप साहेबांची तब्येत आता सुधारत असून, त्यांच्यासाठी प्रार्थना करा’, असे त्या ट्विटमध्ये लिहिण्यात आले होते.
गत बुधवारी सकाळी डिहायड्रेशन आणि युरिनरी इन्फेक्शनच्या त्रासानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी त्यांच्या शरिरातील हिमोग्लोबीनची मात्रा कमी झाल्याचे तसेच पोटॅशिअमची मात्रा वाढल्याचे सांगितले होते. शिवाय डायलिसीसची गरज असल्याचेही सांगितले होते. संध्याकाळी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार ठीक होतील, असा विश्वास बोलून दाखवला होता. कोट्यवधी चाहत्यांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. ते बरे होतील, असे त्या म्हणाल्या होत्या.

Web Title: 5th day update: Know how is Dilip Kumar's condition!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.