52-year-old Milind Soman disclosed his boyfriend's age! | ५२ वर्षीय मिलिंद सोमणने त्याच्या गर्लफ्रेंडच्या वयाचा केला खुलासा!!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता तथा मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या गर्लफ्रेंडच्या वयावरून चांगलाच चर्चेत आहे. स्वत:च्या वयापेक्षा निम्मे वय असलेली एक तरुणी त्याच्या प्रेमात पडली असून, लवकरच हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. परंतु लग्नाअगोदरच मिलिंदवर गर्लफ्रेंडच्या वयावरून सडकून टीका केली जात आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे वय १८ वर्ष इतके सांगितले जात असल्याने, मिलिंद सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. परंतु याचा मिलिंदवर कुठल्याही परिणाम होताना दिसत नाही. कारण तो सातत्याने गर्लफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत आहे. आता तर त्याने चक्क त्याच्या गर्लफ्रेंडच्या वयाचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर तिच्याशी लवकरच लग्न  करणार असल्याचेही म्हटले आहे. 

ALSO READ : गर्लफ्रेंडला पाठीवर बसवून पुशअप्स मारताना दिसला मिलिंद सोमन, व्हिडीओ व्हायरल!

एका पत्रकार परिषदेत जेव्हा मिलिंदला त्याच्या गर्लफ्रेंडचे वय विचारण्यात आले तेव्हा त्याने तिचे वय २६ वर्ष इतके सांगितले. त्याचबरोबर मी जरी ५२ वर्षांचा असलो तरी स्वत:ला २५ वर्षाचा तरुण समजत असल्याचेही मिलिंदने म्हटले. यावेळी मिलिंदने तिच्याशी लग्न  करणार असल्याच्या बातमीलाही दुजोरा दिला. त्याने म्हटले की, ‘तिने लग्नास होकार दिला आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. लग्नाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी, त्यावर आमची चर्चा सुरू आहे. फिटनेसविषयी अतिशय जागरूक असलेला मिलिंद त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो नियमितपणे इन्स्टाग्रामवर शेअर करीत असतो. सध्या तो त्याच्या वयाच्या निम्या असलेल्या गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लवकरच तो त्याची गर्लफ्रेंड अंकिता कोनवा हिच्याबरोबर विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गर्लफ्रेंडसोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. व्हिडीओमध्ये अंकिताला पाठीवर बसवून तो कसरत करीत होता. 
Web Title: 52-year-old Milind Soman disclosed his boyfriend's age!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.