काही दिवसांपासून मॉडेल आणि फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण याची त्याच्यापेक्षा कितीतरी वयाने लहान असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबतची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली असून, सोशल मीडियावर त्यांची लव्हस्टोरी नव्याने रंगविली जात आहे. होय, मुंबई येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये हे दोघे एकत्र आले होते. गेल्या बुधवारी मुंबई येथे अमेजन इंडिया फॅशन वीकच्या (एआयएफडब्ल्यू) स्प्रिंग समर-२०१८ मध्ये मिलिंद गर्लफ्रेंड अंकितासोबत पोहोचला होता. याबाबतचा त्याने एक फोटोही त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर केला. न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद आणि अंकिता या इव्हेंटमध्ये हातात हात घालून आले होते. मिलिंदने रॅम्पवरही आपला जलवा दाखविला. मीडिया रिपोर्ट्सनुसार ५१ वर्षीय मिलिंदच्या गर्लफ्रेंड अंकिताचे वय १८ वर्ष आहे. 
 

मुंबई मिररच्या रिपोेर्टनुसार, मिलिंदची गर्लफ्रेंड अंकिता पेशाने एअरहोस्टेस आहे. मिलिंद सोमनने त्याच्या प्रेमाची ही कथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर झाली. हे दोघे गेल्या वर्षाच्या आॅक्टोबर महिन्यांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. मिलिंदने अंकिताबरोबरचे बरेचसे फोटो शेअर केले आहेत. मिलिंद अखेरीस ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात झळकला होता. चित्रपटात त्याने अम्बाजी पंतची भूमिका साकारली होती. मिलिंद सध्या फिटनेस प्रमोटर आहे. १९ जुलै २०१६ मध्ये मिलिंदने ‘आयरमॅन’ स्पर्धेत यश प्राप्त केले होते. 

२००६ मध्ये मिलिंदने ‘व्हॅली आॅफ फ्लॉवर्स’ या चित्रपटातील स्टार मॅलेन जाम्पनोई हिच्याशी विवाह केला होता. मात्र यांचा विवाह २००९ पर्यंतच टिकला. पुढे या दोघांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर मिलिंद अभिनेत्री सहाना गोस्वामी हिला डेट करीत होता. सहाना आणि मिलिंदच्या वयासदेखील २१ वर्षांचे अंतर होते. पुढे चार वर्षांनंतर त्यांच्यातील नाते संपुष्टात आले. सध्या मिलिंद अंकिताला डेट करीत आहे. अंकिता वय १८ वर्षे असल्याने दोघांच्या वयात बरीच तफावत आहे. आता या दोघांची लव्हस्टोरी पुढे काय वळण घेणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Web Title: 51-year-old Milind Soman shared photo with 18-year-old girlfriends, see photos!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.