4 am ROMANCE CLICK: Sanjay Dutt gets recognition at 4 o'clock! | 4 am ROMANCE CLICK : ​पहाटे ४ वाजता संजय दत्तला आले मान्यतावर प्रेम!!

संजय दत्त सध्या ‘भूमी’ या त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान संजयची पत्नी मान्यता दत्त हिने एक रोमॅन्टिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत मान्यता व संजय एकमेकांत स्वत:ला विसरलेले दिसताहेत. संजयने मान्यताला मिठीत घेतलयं आणि मान्यता हा क्षण डोळे मिटून एन्जॉय करतेय. या फोटोचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. होय, ते म्हणजे हा ‘लव्ह मोमेंट’ फोटो पहाटे ४ वाजता क्लिक केला गेला आहे. आता तुम्ही म्हणाल, हे आम्हाला कसे ठाऊक तर हे आम्हाला काय, अख्ख्या जगाला ठाऊक झालेय. होय, कारण स्वत: मान्यताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे सांगितलयं. ‘घरातील ही ती जागा आहे, जिथे तू मला मिठीत घेतोस,’ असे कॅप्शन मान्यताने या फोटोला दिले आहे. सोबतच, कॅप्शनमध्येच हॅशटॅगच्या माध्यमातून हा फोटो पहाटे ४ वाजता क्लिक केल्या गेल्याचेही सांगितले आहे.ALSO READ : ​काय?? पत्नी मान्यता दत्तचे बिकनी फोटो पाहून भडकला संजय दत्त!!

एकंदर काय तर मान्यता आणि संजयचे प्रेम सध्या चांगलेच बहरू लागले आहे. हा ताजा फोटो त्याचाच पुरावा म्हणायला हवा.  संजयवर मान्यताचे प्रचंड प्रेम आहे. याआधीही सोशल मीडियावर तिने संजयवरील प्रेम जगजाहिर केले आहे.  संजयसोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो तिने पोस्ट केले आहेत.
मध्यंतरी संजय मान्यतावर नाराज असल्याची बातमी आली होती. मान्यताने बिकनीतील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे संजय रागावला असल्याची ही बातमी होती. पण कदाचित हा राग निवळला आहे आणि यदाकदाचित हा राग निवळला नसेल तर तो लवकर निवळावा, अशी आमची इच्छा आहे.
Web Title: 4 am ROMANCE CLICK: Sanjay Dutt gets recognition at 4 o'clock!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.