'3 Idiots' to work with Hariani again! | ‘३ इडियट्स’ सोबत हिराणींना पुन्हा करायचेय काम!

दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा ‘३ इडियट्स’ हा चित्रपट आमीर खान, शर्मन जोशी, आर. माधवन, करिना कपूर खान आणि बोमन ईराणी यांनी उत्तम अभिनयासह साकारला. बॉक्स आॅफीसवर त्यावेळी सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘३ इडियट्स’ चे नाव अग्रस्थानावर आहे.

आता हिराणींच्या डोक्यात पुन्हा एकदा चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचा विचार सुरू आहे. ते म्हणाले,‘आमीर खानसोबत काम करायला खरंच खुप मजा येते. तो अशा काही लोकांपैकी एक आहे जे स्वत:ला भूमिकेत विरघळवून टाकतात.

आमच्याकडे सिक्वेलसाठी खुपच उत्तम आयडिया आहे. मी आणि अभिजात यावर काम करतो आहोत. नंतर आमीरलाही सहभागी करून घेऊच. त्यालाही चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करावेच वाटणार आहे.’ 

Web Title: '3 Idiots' to work with Hariani again!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.