2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा सुपरहिट ट्रेलर लॉन्च, देशातील महागडा चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:30 PM2018-11-03T12:30:00+5:302018-11-03T12:30:00+5:30

2.0 चित्रपटात यामध्ये दाखवण्यात आले की, डॉ. रिचर्ड टेलिकॉक कंपन्यांचा सूड घेण्यासाठी संपुर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो. या सीनमध्ये मेकर्सने एक लाख मोबाइल्सचा वापर केला आहे.

 2.0 Trailer Launch: Superstar Rajinikant Starrer India's most expensive movie ever | 2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा सुपरहिट ट्रेलर लॉन्च, देशातील महागडा चित्रपट

2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा सुपरहिट ट्रेलर लॉन्च, देशातील महागडा चित्रपट

googlenewsNext
ठळक मुद्दे2.0 आहे देशातील सर्वात महागडा चित्रपट बहुप्रतिक्षित सिनेमा २.० चा ट्रेलर चेन्नईत लॉन्च एकाच वर्षात रजनीकांत यांचे दोन लाईव्ह अ‍ॅक्शन चित्रपट रसिकांच्या भेटीलाचित्रपटात सायन्स आणि फिक्शनसोबतच भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार

भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा आणि बहुप्रतिक्षित सिनेमा २.० चा ट्रेलर चेन्नईत लॉन्च करण्यात आला आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्या अभिनयाची जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळणार आहे. २.०चा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये या सिनेमाबाबत आणि विशेषतः ट्रेलरबाबत प्रचंड उत्सुकता होती. ट्रेलर लॉन्चला चित्रपटरसिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी चित्रपटरसिकांच्या उत्साहपूर्ण वातावरणात हा ट्रेलर चेन्नईत लॉन्च करण्यात आला आहे.  एस शंकर यांनी या चित्रपटाचे  दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात डार्क सुपरहीरो डॉ. रिचर्डची भूमिका अक्षय कुमार साकारत आहे. हा चित्रपट रजनीकांतच्या रोबेट चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात सायन्स आणि फिक्शनसोबतच भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे.हा सिनेमा २९ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाने रिलीजपूर्वीचं इतिहास रचला आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर ५४४ कोटी रूपये खर्च झालेत. चित्रपट बनवण्यासाठी ३ हजारांवर टेक्निशियनची मदत घेतली गेली आहे. निश्चितपणे भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा एक व्रिकम आहे. आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर इतका खर्च केला गेलेला नाही. त्यामुळे ‘2.0’ या चित्रपटाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट ३-डीमध्ये शूट केला गेला. हे ही भारतात पहिल्यांदाच झाले आहे. 

यामध्ये दाखवण्यात आले की, डॉ. रिचर्ड टेलिकॉक कंपन्यांचा सूड घेण्यासाठी संपुर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो. या सीनमध्ये मेकर्सने एक लाख मोबाइल्सचा वापर केला आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी जवळपास 50 कोटी रुपयांचा भव्य सेट उभारण्यात आला होता.
 

याचवर्षी ७ जूनला रजनीकांत यांचा ‘काला’ रिलीज झाला होता. सहा महिन्यांत  रजनीकांत यांचा ‘2.0’ हा दुसरा चित्रपट रिलीज होणार आहे. म्हणजे एकाच वर्षात रजनीकांत यांचे दोन लाईव्ह अ‍ॅक्शन चित्रपट रिलीज होतील. हा योग तब्बल २३ वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १९९५ साली रजनीकांत यांचे ‘भाषा’ आणि ‘मुथु’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर यंदा त्यांचे एकापाठोपाठ एक असे दोन चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. साहजिकच रजनीकांतच्या चाहत्यांसाठी ही डबल ट्रिट असणार आहे.

Web Title:  2.0 Trailer Launch: Superstar Rajinikant Starrer India's most expensive movie ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.