16 Years of Devdas Madhuri Dixit Nene shared a Devdas throwback picture and Shah Rukh Khan replied with ‘Maar Daala’ | 16 Years of Devdas: ‘मार डाला...’! ‘चंद्रमुखी’च्या पोस्टवर ‘देवदास’ची गोड प्रतिक्रिया!!
16 Years of Devdas: ‘मार डाला...’! ‘चंद्रमुखी’च्या पोस्टवर ‘देवदास’ची गोड प्रतिक्रिया!!

संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवदास’ या भव्यदिव्य सिनेमाला आज १६ वर्षे पूर्ण झालीत. २००२ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे १२ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाहरूख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही सिनेप्रेमींच्या आठवणीत ताजा आहे. या सिनेमातले सगळेचं काही भव्य होतं. भव्य सेट, भव्य भरजरी पोशाख आणि तितकेच भव्य मधूर संगीत. त्यामुळेच या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले.
चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटातील मुख्य अभिनेता शाहरूख व ‘ट्रॅजिडी किंग’ दिलीप कुमार यांची बरीच तुलना केली गेली. पण याच भूमिकेने शाहरूखला बेस्ट अ‍ॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. यातील ऐश्वर्या व माधुरीचे ‘डोला रे डोला रे’ या गाण्यावरचे बहारदार नृत्यही प्रचंड गाजले. त्यामुळेच प्रेक्षक हा चित्रपट आजही विसरू शकले नाहीत. प्रेक्षकांप्रमाणेच यातील कलाकारांच्या मनातील या चित्रपटाच्या आठवणीही पुसल्या गेलेल्या नाहीत. 


आज ‘देवदास’ला १६ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माधुरीने चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फ्रेममध्ये भन्साळी, शाहरूख व माधुरी दिसताहेत. तिघांचीही गंभीर चर्चा सुरु आहे. ‘Throwback to  Devdas which will always be a film very close to my heart!16YearsOfDevdas,’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले. माधुरीच्या या फोटोवर शाहरूखने लगेच प्रतिक्रिया दिली. ‘u will always be the one jisne ‘Maar Daala!’ असे त्याने लिहिले.


Web Title:  16 Years of Devdas Madhuri Dixit Nene shared a Devdas throwback picture and Shah Rukh Khan replied with ‘Maar Daala’
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.