डोंबिवली : ढोल-ताशांचा खणखणाट आणि तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात डोंबिवली शहराने दिवाळीचे पारंपरिक स्वरूप कायम राखल्याचे बुधवारी पहाटे दिसून आले. मराठमोळया सणसोहळयांचे केंद्र बनलेल्या या शहरातील फडके रोडवर दिवाळी पहाटेनिमित्त तरूण-तरूणींनी एकच गर्दी केली होती. पारंपरिकतेला आधुनिकतेच्या मिळालेल्या जोडीतून दिवाळीचे बदलते रूप अनुभवायला मिळाले. रंगतदार... कमाल आणि धमाल अशा दरवर्षीच्या जल्लोषपूर्ण वातावरणात तसूभरही फरक पडलेला नव्हता.
नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून कुटुंबासह फराळ करण्याकडे कल असला तरी तत्पूर्वी मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा प्रघात गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवलीच्या फडके रोडवर आहे. येथे तरूणाईकडून साजºया होणाºया दिवाळीने वेगळा ठसा निर्माण केला आहे. पारंपरिक आणि आधुनिक वेशात तरूण-तरूणी आपल्या जुन्या-नव्या मित्रांना भेटण्यासाठी तसेच आठवणींना उजाळा देण्यासाठी डोंबिवलीचा नाका समजल्या जाणाºया फडके रोडवर पहाटेपासूनच हजेरी लावतात. प्रारंभी ग्रामदैवत गणेशाचे दर्शन आणि नंतर मित्रांसोबत हास्य विनोद करताकरता चहा नाश्त्याच्या निमित्ताने हॉटेलांमध्येही यथेच्छ गप्पा मारल्या जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हे चित्र दिसून आले. तरूणाईच्या उत्साहाला बुधवारी ढोल पथकांची विशेष साथ लाभली. ढोल-ताशांच्या खणखणाटाने उत्साहात अधिकच भर पडली. श्री गणेश मंदिर संस्थानाच्या वक्रतुंड या पथकासह आरंभ, गर्जना, स्नेहांकित, श्रीमंत, संस्कृती, महाकाल अशा सात ढोल पथकांच्या वादनाने वातावरण पूर्णपणे भारून टाकले होते. ढोलपथकांची कला पाहण्यासाठी फडके रोडच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक पथकात लहान मुले-मुली तसेच महिलांचाही मोठा सहभाग होता. श्री गणेश मंदिर संस्थानच्या प्रवेशद्वारावर भव्य रांगोळी काढण्यात आली होती; तर संस्कार भारतीनेही शुभ दीपावलीचा संदेश देणारी भव्य रांगोळी फडके रस्त्यावर काढली होती.

हुल्लडबाजीचेही दर्शन
गर्दीच्या वेळेस याठिकाणी फटाके वाजविण्यास पूर्णत: बंदी असताना काही तरूणांकडून फटाके वाजविण्याचा प्रताप सुरू होता; तर काही बाईकस्वारांकडून कर्कश आवाजात सायलेन्सर वाजविला जात होता. अखेर पोलिसांनी संबंधितांना समज दिली.

\युवा शक्तीदिनी कलादर्शन
यंदाही श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे अप्पा दातार चौकात युवा शक्ती-भक्ती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवगौरव नृत्यालयातर्फे वैभवशाली महाराष्ट्राचा मराठमोळा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. या दिनाचे यंदाचे १८ वे वर्ष होते. या कार्यक्रमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळते. हा कार्यक्रमही जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. तरूण-तरूणींसह ज्येष्ठांनी मोठया संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

चित्र रेखाटण्याचा मोह : फडके मार्गावरील जल्लोषपूर्ण वातावरण चित्ररूपात रेखाटण्याचा मोह आशुतोष कस्पळे आणि शुभम केसूर या रहेजा स्कुल आॅफ आर्टच्या विद्यार्थ्यांना आवरला नाही. हे दोघेही डोंबिवलीचे असून वातावरणाचे चित्र रेखाटण्याचे शुभमचे हे दुसरे वर्ष आहे; तर आशुतोषने यंदा प्रथमच हे चित्र काढले. वेगवगेळ््या रेखाटण्यात आलेल्या चित्रात गर्दी आणि आजूबाजूच्या इमारतींचा प्रामुख्याने समावेश आहे. फडके मार्गावर रामकृष्ण निवास आहे. तेथून हा संपूर्ण मार्ग दिसतो त्या इमारतीवरून भारावलेल्या वातावरणाचे चित्र रेखाटल्याचे आशुतोषने सांगितले. दिवाळीची सुरूवात अशाप्रकारची चित्रे काढूनच करतो, असेही तो म्हणाला.

जागोजाग पोलीस तैनात
या जल्लोषपूर्ण वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांना पोलीस मित्रांचीही साथ लाभली.