गोदामांमधील अग्नितांडवाने भिवंडीत भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती शक्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:20 PM2018-12-09T23:20:50+5:302018-12-09T23:21:15+5:30

भिवंडीतील गोदाम परिसरात यंदाच्या वर्षात आतापर्यंत आग लागण्याच्या २०० घटना घडल्या आहेत. दरवर्षी या परिसरात अशाच शेकडो घटना घडतात, हा ताजा इतिहास आहे.

Could the fire brigade crash in the godowns repeat the Bhopal crash? | गोदामांमधील अग्नितांडवाने भिवंडीत भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती शक्य?

गोदामांमधील अग्नितांडवाने भिवंडीत भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती शक्य?

googlenewsNext

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी

भिवंडीतील गोदाम परिसरात यंदाच्या वर्षात आतापर्यंत आग लागण्याच्या २०० घटना घडल्या आहेत. दरवर्षी या परिसरात अशाच शेकडो घटना घडतात, हा ताजा इतिहास आहे. माल ठेवण्याकरिता बांधलेल्या अनधिकृत गोदामांत बेकायदा कारखाने चालवले जात असून घातक केमिकलचा साठा अवैधरित्या केलेला आहे. गोदामांच्या परिसरात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आग विझवण्याकरिता बंब पोहोचेपर्यंत किरकोळ आगीचे रुपांतर अग्नितांडवात होते.

भिवंडी परिसरातील गोदामांत वारंवार लागणाऱ्या आगीमुळे हे शहर लाक्षागृह झाले आहे. गोदाम मालकांची आर्थिक लालसा आणि अधिकाºयांचे अर्थपूर्ण संबध यामुळे गोदामांना आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. कुठे केमिकलच्या साठ्याला आग लागते, तर कधी शॉर्टसर्किटमुळे आग भडकते. कधी इन्शुरन्स क्लेमसाठी जाणीवपूर्वक आग लावण्याचा प्रकार केला जातो. या आगीच्या घटनांवर ठोस उपाययोजना करण्याचे धारिष्ट्य दाखवण्यासाठी कोणी पुढे येत नाही, इतकी सरकारी यंत्रणा पोखरलेली दिसून येते.

अंजूरफाटा ते कशेळी-माणकोली हा भाग गोदाम हब म्हणून ओळखला जातो. आता भिवंडी-नाशिक या जुन्या आग्रा रोडकडे वाढू लागला आहे. हा सर्व परिसर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात येत असून अनधिकृत घराचे बांधकाम करणाºया छोट्या शेतकºयांवर कारवाई करणाºया एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी मोठमोठ्या गोदाम बांधकामांकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात बांधकाम करण्यासाठी परवानगी घेऊन त्याचा वापर दाखला रहिवासी, वाणिज्य अथवा औद्योगिक कामासाठी दिला जातो. गोदामांची कामे अवैध असल्याची चर्चा विधानसभेत होते. पर्यावरणमंत्री गोदामांवर कारवाई करण्यास सांगतात. मात्र झालेले बांधकाम ‘जैसे थे’ ठेवून आजूबाजूला नवीन बांधकाम सुरू होते. गोदामाची अजस्त्र लांबीरूंदी व उंची पाहिली की हे बांधकाम किती सुरक्षित आहे, याबद्दल शंका यावी. अशा महाकाय गोदामात तकलादू वायरिंग केले जाते. त्याचा दर्जा पाहण्यास महावितरण अथवा टोरेंन्ट वीज कंपनीचे निरीक्षक न येता त्यांना वीजपुरवठ्याचा दाखला दिला जातो. जेव्हा शॉर्टसर्किटने आग लागते तेव्हा गोदामास केलेल्या वायरिंगची तपासणी सुरू होते. अशा अनेक घटना पंचवीस वर्षात घडल्या असून अनेक गोदामे खाक झाली आहेत. आग लागलेले गोदाम किती लांबी व रूंदीचे आहे, याची नोंद ग्रामपंचायतीकडे नसते. अनेक गोदामांकडून कर आकारणी केली जात नाही. अनधिकृत गोदामे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा दुर्लक्षामुळे माल साठवणूक करण्यासाठी बांधलेल्या गोदामांत विविध उत्पादने सुरू झाली आहेत. विविध वस्तूंचे कारखाने व कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. रहानाळच्या मणीबाई कंपाऊण्डमध्ये असलेल्या गोदामाच्या जागेत प्लास्टिकच्या दाण्यापासून मणी बनवण्याचा कारखाना होता. प्लास्टिक मण्यांना रंग देण्यासाठी लागणारे केमीकलचे ड्रम होते. या कारखान्यातील कामगाराचे मालकाशी वाद झाल्याने त्याने जळती काडी टाकल्याने केमिकलने पेट घेतला आणि कारखाना बेचिराख झाला. यापूर्वी माणकोली भागात प्लास्टिकचे मोती बनवणाºया कारखान्यास आग लागून दोन जणांचा मृत्यू झाला. गोदामांच्या आड असे उत्पादनाचे कारखाने या भागात सुरू आहेत. प्लास्टिक मोती उत्पादनाच्या कारखान्यास कल्याणच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी केली असून त्यांना परवानगी देऊ नये असे पत्र महापालिकेस दिले आहे.

गोदाम भागात पूर्वीपासून केमिकलचा साठा अवैधरित्या केला जात आहे. मुंबईतील जकात वाचवण्यासाठी तसेच मुंबई बाहेरील मालाचे वितरण सोपे जावे म्हणून या गोदामांत माल साठवला जात आहे. गोदामाच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास न झाल्याने कोणताही अपघात झाल्यास नियंत्रण करणे कठीण जाते. आगीसारख्या भयंकर घटना घडत असतानाही शासनाच्या विविध यंत्रणांनी व पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण आणलेले नाही. २०१६ मध्ये ३०१, २०१७ मध्ये २५७ तर २०१८ मध्ये आतापर्यंत २००पेक्षा जास्त आगीच्या घटना घडल्या. आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने आ. शांताराम मोरे यांनी गोदाम भागात सक्षम अग्निशमन यंत्रणा उभी करण्याची मागणी केली होती. आग विझवण्याची यंत्रणा परिसरात नसल्याने आग लागताच अग्नितांडव सुरू होते. वारंवार लागणाºया आगीमुळे परिसरात पसरणाºया केमिकलच्या धुरामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. विषारी धूर पसरल्यास भोपाळ गॅस दुर्घटनेसारखी दुर्घटना होण्यास वेळ लागणार नाही.

Web Title: Could the fire brigade crash in the godowns repeat the Bhopal crash?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.