मुलांशी संवाद साधताना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:01 AM2018-03-04T01:01:37+5:302018-03-04T01:01:37+5:30

१० वर्षांचा भाऊ आणि १६ वर्षांची बहीण असलेली एक आई माझ्याकडे समुपदेशनाकरिता आली. या दोन्ही वयांतील भावंडांमध्ये होणारे शारीरिक, मानसिक बदलांना पालक म्हणून कशा पद्धतीने सामोरे जावे, याचे उत्तर तिला सापडत नव्हते.

When communicating with children! | मुलांशी संवाद साधताना!

मुलांशी संवाद साधताना!

- डॉ. मिन्नू भोसले

१० वर्षांचा भाऊ आणि १६ वर्षांची बहीण असलेली एक आई माझ्याकडे समुपदेशनाकरिता आली. या दोन्ही वयांतील भावंडांमध्ये होणारे शारीरिक, मानसिक बदलांना पालक म्हणून कशा पद्धतीने सामोरे जावे, याचे उत्तर तिला सापडत नव्हते. अखेरीस ६-७ महिन्यांचा अवधी घेऊनच ही उपचार पद्धती ठरवून, या भावंडाना हसत-खेळत काही गोष्टी शिकविल्या. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. हे आव्हान आजच्या काळातील ब-याच पालकांना स्वीकारावे लागते, याच विषयीचे हे मार्गदर्शन...

वेगवेगळ्या टप्प्यांनुसार विद्यार्थ्यांना कसे समजावून सांगावे?
३ ते ६ या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होत असते व ग्रहणशक्ती प्रचंड असते. नवनवीन गोष्टी, भाषा मुले शिकत असतात. आपण जेवणाच्या, शिस्तीच्या, भाषेच्या ज्याप्रमाणे सवयी शिकवितो, त्याचप्रमाणे त्यांच्याशी लिंग व सेक्सविषयी बोलले पाहिजे. ३ वर्षांच्या मुलाला मुलगा/मुलगी हा फरक समजतो न शिकविता. म्हणजेच आपल्याला लैंगिक शिक्षणाची सुरुवात मूल ३ वर्षांचे झाले की करायची आहे. आज त्यासाठीचा लक्ष्य गट आहे, ३ ते २४ वर्षे वयाचा. आज समाजात घडणाºया घटना आपण बघतो आहोतच.

६ ते १२ वर्षांच्या मुलांमध्ये दृष्टीकोन आणि विचारांची जडण-घडण होत असते, त्याविषयी सांगा.
तुम्ही निरीक्षण केले असेल, तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. वर्गात मुला-मुलींचे बेंचेस वेगवेगळे असतात. एकमेकांबद्दल तिरस्कार असतो. मुली काय अशाच किंवा मुले काय असेच, असा शिक्का बसलेला असतो. भांडणे होत असतात. घरात मुलगा व मुलगी दोघेही असतील, तर मुलगा वर्चस्व दाखवायला लागतो... मी मुलगा आहे... मी ताकदवान आहे ... मला हे करण्याची मुभा आहे इ. हा काळ आहे संस्काराचा किंवा एकमेकांबद्दल आदर प्रस्थापित करण्याचा, निकोप स्त्री-पुरुष संबंधाचा पाया मजबूत करण्याचा. ८ ते १० वर्षांमध्ये (मुलांमध्ये थोडे उशिरा) आंतरिक शारीरिक बदल लिंगसापेक्ष दिसायला सुरुवात होते अन् त्याबाबत त्याला प्रश्न पडायला लागतात. त्याला जिज्ञासा, कुतूहल आहे, शरीरात घडणाºया घडामोडींचे. अयोग्य, चुकीच्या पद्धतीने मुले माहिती घेत असतात. कारण घरी या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. माध्यमे व मित्रमंडळाचा प्रभाव या वयात खूप असतो. व्दिअर्थी, सेक्स संबंधित विनोद मुले करताना आढळतील. १२व्या व १४व्या वर्षी मानसिक पातळीवर होणारा बदल वेगळा आहे. १२ वर्षांच्या मुलाला नक्कीच काही प्रश्न पडतात, ते त्याला न संकोचता विचारता येण्यासाठी घरात मोकळे वातावरण असायला हवे. आपल्या समाजात आई मुलीला चार गोष्टी सांगत असते, पण वडील मुलाशी या विषयावर बोलताना आढळत नाहीत, ही दुर्दैवाची, चिंतेची बाब आहे.

१२ वर्षांनंतर पालकत्वाचे खरे आव्हान सुरू होते, त्या प्रक्रियेदरम्यान कसे समजावून सांगावे?
१६ वर्षे व पुढील टप्प्यात त्यांच्यात झालेल्या बदलांविषयीची त्याला/ तिला थोडी-फार जाण आलेली आहे. या टप्प्याला ‘स्वीट सिक्सटीन’ म्हणतात. लव्ह लेटर पाठविणे, गर्ल/बॉयफ्रेंड असणे, रोझ डे, व्हॅलेंटाइन डे अशा गोष्टींचे आकर्षण वाटण्याचे हे वय. याही वयात मित्रांचा प्रभाव असतो, पण लिंग निरपेक्ष मैत्री, मित्राचे आपल्या आयुष्यातील स्थान, चांगला/वाईट मित्र या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला जात नाही. या वयात त्यांच्यात होणाºया बदलामुळे बॉय/गर्लफ्रेंड असणे त्यांना स्टेटस सिम्बॉल वाटते. पालकांनीही हे ध्यानात घ्यायला हवे की, त्यात गैर काही नाही. एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे.
मुलींना पाळी येणे हे अगदी नैसर्गिक आहे आणि हे आई समजूनही घेत असते. मुलांच्या बाबतीत असे घडत नाही. वर्गात लिंग उद्दपीत झाले, तर काय करायचे, हे मुले विचारू शकत नाहीत किंवा पालकांनीही त्याला काही सांगितलेले नसते. ते त्यांच्या मित्रांशी बोलतात. चुकीची माहिती, ज्ञान अयोग्य पद्धतीने त्यांना मित्रांकडून मिळते. १६ वर्षांच्या मुला-मुलीत मुले जन्माला घालण्याची शारीरिक क्षमता असते, पण जबाबदारी पेलण्याची नसते. २० ते २४ हा स्वओळख तयार करण्याचा, चूक-बरोबर पारखून निर्णय क्षमता विकसित करण्याचा काळ! पण मुले २४ वर्षांची होईपर्यंत पालकांनी भावनिक व सामाजिक स्तरावर असणाºया समस्यांविषयी बोलायला पाहिजे.

Web Title: When communicating with children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई