Salman Khan and Katrina Kaif's break-up was a huge blessing for this actress | सलमान-कतरिनाच्या भांडणामुळे 'ही' अभिनेत्री रातोरात बनली हिरॉईन, जाणून घ्या काय घडलं पडद्यामागे
सलमान-कतरिनाच्या भांडणामुळे 'ही' अभिनेत्री रातोरात बनली हिरॉईन, जाणून घ्या काय घडलं पडद्यामागे

ठळक मुद्देसलमान आणि कॅटरिनाचे प्रेमसंबंध आणि त्यांचा ब्रेकअप सर्वांना माहित असलेली गोष्ट आहे. सलमानने कॅटरिनाला  आज तू जे काही आहेस ते  माझ्यामुळे, तू  माझ्यामुळे घराघरात ओळखली जातेस हे लक्षात ठेव असे सुनावले होते

मुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री डेसी शहाची मैत्री सर्वश्रुत आहे. डेसी सलमानच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. डेसीला बॉलिवूडमध्ये हिरॉईन म्हणून सलमाननेच लाँच केले.  पण डेसी हिरॉईन म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकली ती कतरिना कैफमुळे. डेसीच्या लाँचमागे कतरिनाची महत्वाची भूमिका होती असे वृत्त स्पॉटबॉयइ वेबसाईटने दिले आहे. 

सलमान आणि कतरिनाचे प्रेमसंबंध आणि त्यांचा ब्रेकअप सर्वांना माहीत असलेली गोष्ट आहे. पण दोघांनी कधी जाहीरपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. आता त्यांच्यामध्ये पुन्हा चांगली मैत्री झाली असली तरी मध्यंतरीच्या काळात दोघांच्या नात्यामध्ये सर्वकाही आलबेल नव्हते. स्पॉटबॉयइच्या वृत्तानुसार सलमान आणि कतरिनामध्ये एकदा वाद झाला होता. 

त्यावेळी सलमानने कतरिनाला आज तू जे काही आहेस ते  माझ्यामुळे, तू  माझ्यामुळे घराघरात ओळखली जातेस हे लक्षात ठेव, असे सुनावले होते. त्यावेळी कतरिनाने मी माझ्या टॅलेंटच्या बळावर मोठी झालीय असे उत्तर सलमानला दिले. त्यावेळी तिने सलमानला ओपन चॅलेंज केले होते. तुझ्या पाठिंब्यामुळे मी मोठी झालीय, असे तुला वाटते तर तू तुझ्या पसंतीने कोणाचीही निवड कर आणि तिला स्टार बनवून दाखव असे आव्हान दिले होते. 

त्यावेळी सलमानने हिरो-हिरॉईनच्या मागे नाचणा-या डेसीची निवड केली. डेसी त्यावेळी गणेश आचार्यच्या डान्सग्रुपमध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती. कतरिनाच्या त्या चॅलेंजमुळे डेसीचे स्टार फिरले आणि ती रातोरात स्टार झाली. सलमानने तिला जय हो चित्रपटामध्ये आपली नायिका म्हणून संधी दिली होती.  डेसीला अजूनही कतरिना इतके स्टारस्टेटस लाभलेले नाही पण नायिकेच्या रोलसाठी तिच्या नावाची चर्चा होते.                  


 


Web Title: Salman Khan and Katrina Kaif's break-up was a huge blessing for this actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.