माणसाचं मन मेंदूतच दडलंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:37 AM2018-04-01T01:37:43+5:302018-04-01T01:37:43+5:30

मेंदू नेमका काय आहे? याविषयी वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोके्रटीस यांनी दिलेल्या सर्वसमावेशक उत्तराचा आढावा आपण गेल्या लेखात घेतला होता. पण इतर काही शास्त्रज्ञांनाही मेंदूविषयी उत्सुकता होती. त्याविषयी...

 Man's mind was buried in the mind! | माणसाचं मन मेंदूतच दडलंय!

माणसाचं मन मेंदूतच दडलंय!

Next

- प्रा. रचना पोतदार-जाधव

मेंदू नेमका काय आहे? याविषयी वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोके्रटीस यांनी दिलेल्या सर्वसमावेशक उत्तराचा
आढावा आपण गेल्या लेखात घेतला होता. पण इतर काही शास्त्रज्ञांनाही मेंदूविषयी उत्सुकता होती. त्याविषयी...

आॅरिस्टॉटलप्रमाणेच अनेक ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी मेंदू आणि मनाबद्दल कमालीची वैविध्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण मतं मांडली आहेत. ‘‘आपला मेंदू हाच आपल्या मनाचा अवयव आहे आणि तोच आपल्या आत्म्याचं मंदिर आहे.’’ अशी संकल्पना इ. स. पूर्व ६व्या शतकात, ग्रीक तत्त्ववेत्ता पायथागोरस आणि अल्कमियन यांनी मांडली होती. या दोन विचारवंतांपासून हिप्पोक्रेटीस आणि त्याचाच समकालीन प्लॅटो यांनी प्रेरणा घेतली आणि स्वत:चे विचार मांडले.

प्राचीन काळी इजिप्तमध्ये पिरामिड बनण्याआधी माणूस मेल्यानंतर त्याचं हृदय जनत करून ठेवलं जात असे आणि मेंदू मात्र नष्ट केला जात असे. इतकं हृदयाला महत्त्व होतं. आतापर्यंतच्या पाश्चिमात्य विचारवंतांत सर्वांत प्रभावशाली असणाऱ्या आॅरिस्टॉटललादेखील मेंदूपेक्षा हृदय सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटलं आहे. त्याच्या मते आत्मा हृदयातच असतो. शरीर आणि आत्मा यांचे अस्तित्व हे वेगवेगळं असून आत्माच माणसाच्या विचारांचं मूळ आहे. त्याने कीटक, अळ्या, मासे अशा अनेक प्राण्यांच्या केलेल्या निरीक्षणावरून सर्वांना धडधडणारे हृदय असते हे समजले होते; पण मेंदूबद्दल मात्र संदिग्धता होती. प्राण्यांच्या शरीरातील सर्व रक्तवाहिन्या हृदयाकडेच जात असल्याचं निरीक्षण त्यानं केलं. तसेच हृदयाला स्पर्श केल्यास हृदय झटका बसल्यासारखं आखडतं. परंतु मेंदूला स्पर्श केल्यास अशी काही हालचाल होत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच मेंदूपेक्षा जीवंत असणारं हृदयच महत्त्वाचं. कारण तेच संपूर्ण शरीराचं नियंत्रण करतं. आणि त्यातच आपल्या आत्म्याचं अर्थात मनाचं अस्तित्व आहे, असं आॅरिस्टॉटलला वाटे.
आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक हिप्पोके्र टीस (ख्रिस्तपूर्व ४६०-३७७) यानेही हृदयापेक्षा मेंदूलाच महत्त्व दिले आहे. आपल्या आशा, आकांक्षा, भावना, संवेदना, कल्पना, भीती, निराशा, झोप, आठवणी, विसराळूपणा, प्रेरणा, भाषा, आकलन क्षमता, निर्णय क्षमता या सर्वांचं रहस्य मेंदूतच दडलंय. हे त्यांनी कुठल्याही आधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणांची मदत न घेताही नोंदवून ठेवलंय. त्याच काळात असणारा डेमॉक्रेटस
(ख्रिस्तपूर्व ४६०-३६२) यानंही मेंदू
मानवी शरीराचा केंद्रबिंदू असून, तोच माणसाच्या सर्व कृतींवर, भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण आणि लक्ष ठेवतो, असं म्हटलं आहे.
सॉक्रेटिस (ख्रिस्तपूर्व ४६९-३९९) या समकालीन महान तत्त्ववेत्त्याने, ‘‘शरीर आणि मेंदू यापासून आत्मा वेगळा असतो आणि मृत्यूनंतरही आत्मा जीवंत असतो, असे विचार नोंदवले आहेत. यावर आधारित मन (माईंड) आणि वस्तू (मॅटर) हे द्वैत नंतरच्या काळात उभं राहिलं.
सॉक्रे टिसचाच प्रसिद्ध शिष्य म्हणजे प्लेटो (ख्रिस्तपूर्व ४२७-३४७.)याने आपली बोधन क्षमता, आकलन क्षमता यांची कारणमीमांसा या आपल्या मेंदूत, आपला आत्मा आपल्या हृदयात तर भूक आपल्या उदरात दडलेली असते. या सगळ्या क्षमता पाठीतल्या कण्यातल्या ‘मॅरोजन एकमेकांशी जोडलेल्या असतात, तसेच आपण अनुभवणाºया सर्व भावना या रक्तवाहिन्यांतील रक्तातून प्रवाहित होतात, असं प्लेटोला वाटे. मनाच्या संकल्पनेलाच प्लॅटो आत्मा म्हणे आणि आपल्या शरीरापेक्षा आत्मा वेगळा आहे. त्यामुळे शरीर नश्वर असलं तरी आपला आत्मा जीवंतच असतो असं त्याला वाटे. प्लेटो गणितज्ञसुद्धा होता. त्याने भौमितिक आकार मानवी शरीरासाठी वापरून मेंदूबद्दल चमत्कारिक युक्तिवादाने निष्कर्षदेखील काढले. त्याच्या मते वर्तूळ किंवा गोल आकार हा परिपूर्ण आकार आहे. आणि सर्वसाधारणपणे मानवाचं डोकं गोलाकार असल्यामुळे त्याच्या आतला मेंदूच माणसाचं मन नियंत्रित करीत असला पाहिजे.
जगप्रसिद्ध डॉक्टर, तत्त्ववेत्ता आणि वैज्ञानिक असणाºया गेलन यांनीदेखील मानवी शरीरशास्त्र, मेंदू आणि मन यावर सखोल प्रयोग करून महत्त्वपूर्ण ज्ञान निर्माण केलं आहे. ग्रीस आणि रोम ही दोन शहरं त्यांची कार्यभूमी होते. त्या काळी असणारे हिंसक योद्धे ज्यांना ग्लॅडिएटर्स म्हटले जाई, त्यांची श्रीमंत घराणी आपल्या विरंगुळ्यासाठी आणि मौजेसाठी दोन ग्लॅडिएटर्समध्ये किंवा प्राण्यांसोबत झुंज लावत असत आणि त्याचा आस्वाद घेत असत. अशा या झुंजीत अनेक योद्धे धारातीर्थी पडत किंवा जखमी होत. त्यांचा डॉक्टर म्हणून गेलन यांनी खूप काम केलं. त्या अनुभवांतून आणि निरीक्षणांवरून त्यांना माणसाचं डोकं, मेंदू, मज्जातंतू, संवेदनाक्षम नसा, पाठीतून जाणारा मज्जारज्जू या सर्वांच्या कार्यप्रणालीबद्दल आणि रचनेबद्दल सखोल माहिती मिळाली.
या सर्व ज्ञानातून, गेलन यांनी निष्कर्ष काढला आहे की, माणसाचं मन हे इतरत्र कुठेही नसून त्याच्या मेंदूतच दडलंय. आणि विविध संवेदना आणि भावना या सर्व मेंदूचीच निर्मिती आहे. गेलननी मांडलेल्या सिद्धान्तानुसार संवेदना आणि हालचाल या मेंदूतूनच प्रवाहित होतात. माणसाच्या आत्म्याचं अस्तित्वदेखील मेंदूतच आहे. मेंदूभोवती असणाºया ६ँ्र३ी ें’३ी१ या आवरणात माणसाच्या मानसिक शक्ती असतात असं तो म्हणे. परंतु ४थ्या शतकात आलेल्या नेमिसस आणि आॅगस्टीन यांनी मात्र मेंदूत असलेल्या पोकळीत अर्थात ५ील्ल३१्रू’ी२ मध्ये आपला आत्मा आणि सारासार विचार करण्याची क्षमता असते, असं म्हटलं आहे. मात्र त्यानंतरही १५०० वर्षे गेलनच्या संकल्पनांचा प्रभाव कायम होता. त्या काळातील चर्च आणि मशिदीनींसुद्धा मुक्तपणे गेलनच्या विचारांचा स्वीकार केला होता.

Web Title:  Man's mind was buried in the mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई