सक्षम वकील होण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:51 PM2018-03-31T23:51:06+5:302018-03-31T23:51:06+5:30

सेटलवाड यांनी पुस्तकात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवण सांगितली आहे. एकदा त्यांनी वर्गात अनुपस्थित मित्राची हजेरी दिली. प्राध्यापकांना संशय आला. त्यांनी पुन्हा पुकारा केला. सेटलवाड गप्प बसले.

To become a competent lawyer ... | सक्षम वकील होण्यासाठी...

सक्षम वकील होण्यासाठी...

- अ‍ॅड. नितीन देशपांडे

सेटलवाड यांनी पुस्तकात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवण सांगितली आहे. एकदा त्यांनी वर्गात अनुपस्थित मित्राची हजेरी दिली. प्राध्यापकांना संशय आला. त्यांनी पुन्हा पुकारा केला. सेटलवाड गप्प बसले. त्यांना पश्चात्ताप झाला. पण त्यांनी स्वत:ची समजूत घातली की, ज्या सुमार दर्जाची लेक्चर्स त्यांना ऐकावी लागत होती ती पाहता हा खोडसाळपणा अगदीच किरकोळ होता. ते म्हणतात, महाविद्यालयीन जीवनातील वर्षं आपण सत्कारणी लावली नाहीत. भारतीय न्याय व्यवस्थेने जे काही कायदेपंडित तयार केले त्यात आपल्या शिक्षण पद्धतीचा फारच थोडा वाटा आहे.

मोतीलाल सेटलवाड स्वतंत्र भारताचे पहिले अ‍ॅटर्नी जनरल. भारतीय राज्यघटनेच्या ७६ व्या कलमानुसार निर्माण झालेल्या या घटनात्मक पदाची धुरा त्यांनी दशकाहून जास्त काळ समर्थपणे पेलली. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या व भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वकिलांचे आणि न्यायाधीशांचे जे काही योगदान झाले आहे त्यात त्यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
जुन्या काळचे वकील किंवा न्यायाधीश कशा पद्धतीने काम करत असत याची अटकळ बांधण्याचे दोनच मार्ग आहेत. एक तर त्यांना ज्यांनी काम करताना प्रत्यक्ष पाहिले अशा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध वकील अथवा न्यायधीशांशी संवाद साधणे किंवा निरनिराळी आत्मचरित्रे किंवा चरित्रे वाचणे, अशा कायदे पंडितांना ‘यू ट्यूबवर’ भेटता आले असते तर किती बहार आली असती?
पूर्वी हायकोर्ट लायब्ररीत करसेटजी भाभा किंवा बार रूममध्ये अरविंद बोबडे यांच्याकडून आणि आता अविनाश राणा यांच्याकडून बोलता बोलता मला बरीच माहिती मिळत आली आहे. सर्व जण सेटलवाड यांच्याविषयी भरभरून बोलतात. सॉलिसिटर दिवेकर पुण्यात स्थायिक झाल्यानंतर काही तरी शंका घेऊन मी त्यांना भेटत असे. त्यांनी जीनांपासून अनेक वकिलांना काम करताना पाहिले होते. त्यांनी एकाच वाक्यात मला सांगितले, ‘‘सेटलवाड कोर्टात नुसते उभे राहिले की एक विद्वान मनुष्य उभा राहिल्याची खात्री पटे.’’
भारतीय राज्यघटनेतील राष्टÑपतींच्या अधिकारासंबंधीचे लेक्चर संपल्यानंतर आमच्या प्राचार्यांनी मला सेटलवाडांच्या ह्यट८ छ्राी छं६ ंल्ल िड३ँी१ ळँ्रल्लॅ२ह्ण वाचायला सुचविले होते. मी ते अधाशासारखे वाचून काढले होते. त्यात ‘छं६’ जास्त आणि 'ङ्म३ँी१ ळँ्रल्लॅ२' फारच कमी आहेत. त्यामुळे कायदा क्षेत्रात एका मर्यादेपुढे रस नसेल तर वाचक कंटाळेल.
सेटलवाडांसारखे लोक यशस्वी ठरू शकले कारण त्यांच्या घरातच त्यांना बाळकडू मिळाले होते. न्या. छागला म्हणतात की, त्यांच्या नजरेत असंख्य तरुण वकील हुशार असूनही केवळ योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने मागे पडले. फली नरिमन म्हणतात, वकिलावर त्यांच्या तब्येल्याची छाप असते. कोणाचेही मार्गदर्शन न घेता वकिलीत उतरलेले आणि या क्षेत्रात नाव कमावलेले गजेंद्रगडकर किंवा हिंदायतुल्ला विरळेच. हे ‘पांडवांच्या बातीत ठीक आहे’ पण न्या. छागलांनी हळहळ व्यक्त केलेल्या ‘असंख्य एकलव्यांचे’ काय?
महाभारताच्या उद्योगपर्वात ज्ञानप्राप्तीचे चार मार्ग सांगितले आहेत.
‘‘आचार्यत् पादमादत्ते पादं शिष्य: स्वमेधया! पादं सब्रह्यचारिभ्य: पादं कालक्रमेणच!!’
एक चतुर्थांश ज्ञान गुरूंकडून मिळते. त्याचा उपयोग करून उरलेले एक चतुर्थांश सहकर्मी/सहपाठी व्यक्तीशी चर्चा करून मिळते आणि उरलेले ज्ञान काळानुसार अनुभवातून प्राप्त होते. (सध्या इंटरनेटच्या जमान्यात शेवटची ओळ ‘प्यादे अंतर्जालन’ म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून एक चतुर्थांश ज्ञान मिळू शकते, असेही गमतीने म्हटले जाते.)
गुरुजनांकडून मिळालेल्या एक चतुर्थांश ज्ञानाकडे दिवसेंदिवस अनुभवानुसार आपण जास्तीत जास्त व्यापक दृष्टिकोनातून बघून परिपक्वतेकडे झुकतो. त्यामुळे गुरूकडून मिळालेले (म्हणजेच यासंदर्भात महाविद्यालयात मिळालेले) ज्ञान हा पाया आहे. कायद्याची शिक्षण पद्धती वकिली व्यवसायाला अजिबात पूरक नाही. त्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वकिलास त्याचा काहीच उपयोग होत नाही.
उंट तिरका जातो, हत्ती सरळ चालतो हे पाठ करून कोणी विश्वनाथन आनंद होईल काय? कायद्याच्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा हा सी.ए.च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे असायला हवा. याबाबतीत बॉम्बे इन्कॉर्पोरेट लॉ सोसायटीच्या सॉलिसिटरच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा वाखाणण्याजोगा आहे. शिक्षण पद्धतीने केवळ माहिती पाठ करायला नव्हे तर विश्लेषणात्मक व तार्किकपणे विचार करायला शिकविले पाहिजे. परवाच एका न्यायालयात न्यायमूर्ती वैतागल्या, कारण ओळीने दहा प्रकरणांत दोन्ही बाजूंची तयारी नव्हती. या क्षेत्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता सक्षम वकील बनविणाऱ्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून आहे.

Web Title: To become a competent lawyer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :advocateवकिल