मित्रांनो, वेळीच सावध होऊन स्वत:च्या कुटुंबाचा विचार करा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 04:16 PM2019-04-01T16:16:12+5:302019-04-01T16:20:29+5:30

मित्रांनो सध्या देशाच्या भविष्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता सुरू आहे. युवकांना भडकावणे व जातीपातीचे राजकारण सुरू आहे. देशाच्या राजकारणात एकमेकांना शिव्या घालणारे एकमेकाच्या गळ्यात गळे घालत आहेत. गेली साडेचार वर्षे भाजपला शिव्या घालणारे उध्दव ठाकरे आज भाजपच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत.

Friends, be careful about your own family ..! | मित्रांनो, वेळीच सावध होऊन स्वत:च्या कुटुंबाचा विचार करा..!

मित्रांनो, वेळीच सावध होऊन स्वत:च्या कुटुंबाचा विचार करा..!

Next
ठळक मुद्देराजकारणात एकमेकांना शिव्या घालणारे एकमेकाच्या गळ्यात मित्रांनो, वेळीच सावध होऊन स्वत:च्या कुटुंबाचा विचार करा..!

मित्रांनो सध्या देशाच्या भविष्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता सुरू आहे. युवकांना भडकावणे व जातीपातीचे राजकारण सुरू आहे. देशाच्या राजकारणात एकमेकांना शिव्या घालणारे एकमेकाच्या गळ्यात गळे घालत आहेत. गेली साडेचार वर्षे भाजपला शिव्या घालणारे उध्दव ठाकरे आज भाजपच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत.

भरभरून पदे देऊनही मोहिते-पाटील, वसंतदादा, विखे- सारखी राज्यात नावाजलेली घराण्यांनी पक्ष सोडले. शरद पवार यांना शिव्या घालून मोठे झालेले खासदार राजू शेट्टी आज त्यांच्यासह कॉंग्रेस बरोबर आहेत. राजू शेट्टींमुळे मोठे झालेले सदाभाऊ खोत आज भाजप बरोबर आहेत. राजू शेट्टी यांनी पराभव केलेले आवाडे शेट्टींबरोबर आहेत.

इचलकरंजीतील आमदार सुरेश हाळवणकर व राष्ट्रवादीचे अशोक स्वामी एकत्र आले. ज्यांनी राजू शेट्टींना उभे करण्यात ताकद खर्च केली त्या आमदार उल्हास पाटील यांच्या विरोधात शेट्टी गेले. ज्या माने घराण्याला कॉंग्रेस, राष्ट्रवादी ने आयुष्यभर पदे दिली ते आज विरोधात. ज्या शिवसेनेने विनय कोरे यांचा पराभव केला ते कोरे आज शिवसेनेबरोबर.

चंदगड च्या पाटीलकीत एकमेकांना शिव्या घालणारे भरमू पाटील, गोपाळराव पाटील, नरसिंग पाटील अधूनमधून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत असतात. गडहिंग्लजमध्ये कुपेकर, श्रीपतराव शिंदे विरोधात लढले पण ते कारखान्यात एकत्र. कागलकरांचे काय सांगायलाच नको. कोण कोणाबरोबर समजून येत नाही.

आजऱ्यात देसाई, शिंपी, आपटे, चराटी अधूनमधून एकत्र येऊन धक्का देत असतात. भुदरगड मध्ये के. पी. यांनी पुत्र मानलेले आ. प्रकाश आबिटकर, केपींच्या विरोधात आमदार झाले. तर सतत एकमेकांना पाण्यात बघणारे माजी आमदार बजरंग देसाई व के पी एकत्र आले. ज्या महाडिक कंपनीने जिल्ह्यातील काँग्रेस संपवली त्या महाडिक यांच्याबरोबर कॉंग्रेसचे निष्ठावंत पी. एन. पाटील आहेत.

ज्या धनंजय महाडिक यांना खासदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्या आमदार सतेज पाटील यांना सहा महिन्यातच महाडिक यांनी रंग दाखवला. राष्ट्रवादीचे खासदार असून विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पाडण्यात पडद्यामागे राहिले. जिल्हा परिषद निवडणुकीत पी.एन. पाटील यांच्या मुलाला डावलून महाडिकांनी घरातील अध्यक्ष केला,महानगरपालिका निवडणुकीत महाडिक यांनी तेच केले.

मंडलिक व घाटगे अनेक वर्षे विरोधात लढले ते आज एक आहेत. एकंदरीत गोतावळ्याचं भलं करण्याच्या नादात सर्वच राजकारणी रंग बदलत आहेत. आणि खाली कार्यकर्ते भांडत बसत स्वत:चा वेळ, पैसा, शक्ती खर्च करुन वैयक्तिक संबंध बिघडत आहेत. ज्यांची वैयक्तिक कामे नेत्यांनी केलेली आहेत ते नेत्यांची निष्ठा सांगत असतात.

आज सामान्य माणसांची कामे नेत्यांजवळ काहीही नसतात. प्रत्येकाच्या वैयक्तिक संबंधांवर जो तो कामे करुन घेत असतात, पण नेत्यांचे चमचे तरुणांना भडकवत असतात. मित्रांनो वेळीच सावध होऊन स्वत:च्या कुटुंबाचे भले करा. मुन्ना महाडिक की संजय मंडलिक, राजू शेट्टी की धैर्यशील माने, मोदी की राहुल गांधी या विषयावर भांडणे सोडून द्या. कोणीही नाही खरा. गडया आपला घर संसाराचं बरा.

(सौजन्य : सोशल मिडीयावरील विचार)

Web Title: Friends, be careful about your own family ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.