भाष्य - दिव्यांकाचे कटुसत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:17 AM2017-08-21T00:17:28+5:302017-08-21T00:18:17+5:30

Annotation - The Criteria of the Divine | भाष्य - दिव्यांकाचे कटुसत्य

भाष्य - दिव्यांकाचे कटुसत्य

Next

पूर्वी असे म्हटले जायचे की, ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’; परंतु आता त्यात थोडासा बदल करून ‘बलात्कार झाला नाही असा दिवस कळवा आणि हजार मिळवा’, असे म्हटले तर एकाच दिवशी कितीतरी बक्षिसांची खैरात करण्याची वेळ शासनावर येईल. यावरून देशात बलात्काराची समस्या दिवसेंदिवस किती उग्र रूप धारण करीत आहे, याची प्रचिती येते. रोज कुठे ना कुठे बलात्काराची घटना घडत असून, यात निष्पाप, निरागस बालिकाही वासनांधांच्या विकृतीला बळी पडत आहेत. आता काल-परवाच स्वातंत्र्यदिनी चंदीगडमध्ये एका अल्पवयीन बालिकेवर बलात्काराची घटना घडली. विकृत मनोवृत्तीच्या हैवानांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व तरी काय कळणार? हे चित्र पाहून ‘मला मुलगाच व्हावा, असा माझा हट्ट नाही; पण मुलीला जन्म द्यायची आता भीती वाटते. स्वर्गातून नरकात का ढकललं असं तिनं विचारलं तर तिला काय उत्तर देऊ?’ असा अस्वस्थ करणारा प्रश्न चित्रपट अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिष्ट्वटद्वारे विचारला आहे. दिव्यांकाची ही अस्वस्थता याठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाची असली तरी देशभरातील कितीतरी पहिलटकरीण महिलांना ही सल कधीपासून अस्वस्थ करीत आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण करताना महिला सुरक्षीकरण करणे अधिक गरजेचे झाले आहे, कारण सुरक्षित असल्याचा विश्वास महिलांमध्ये जोवर निर्माण होत नाही, तोवर त्या सक्षम तरी कशा होऊ शकतील? म्हणूनच ‘मोदीजी, स्वच्छ भारत मोहीम राबविताना देशातील बलात्काररूपी कचराही साफ करा. एकवेळेस कचºयाच्या ढिगाºयासोबत जगता येईल; पण अशा लांडग्यांच्या दहशतीखाली जगणं कठीण आहे’, असा संतापही दिव्यांकाने आपल्या टिष्ट्वटमध्ये व्यक्त केला आहे. यावर आता पंतप्रधान मोदी किती गांभीर्याने पाऊल उचलतात याची प्रतीक्षा आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ असे म्हणत महासत्तेची स्वप्ने अवश्य पहावीत; परंतु ज्या देशात महिलाच सुरक्षित नसतील तर देश खºया अर्थाने महासत्तेच्या दिशेने आगेकूच करीत आहे, हे कोणत्या न्यायाने म्हणता येईल?

Web Title: Annotation - The Criteria of the Divine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा