भाजपापुढे अंतर्गत कलहाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:49 PM2018-11-18T13:49:07+5:302018-11-18T13:50:09+5:30

- सुरेश विसपुते  महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलहास सुरूवात झाली आहे. एकीकडे शहराचे आमदार अनिल ...

BJP's internal challenge is challenging | भाजपापुढे अंतर्गत कलहाचे आव्हान

भाजपापुढे अंतर्गत कलहाचे आव्हान

googlenewsNext

- सुरेश विसपुते 
महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलहास सुरूवात झाली आहे. एकीकडे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी अन्य पक्षातील विशेषत: राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाºयांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याच्या धोरणास तीव्र विरोध दर्शविला.एवढेच नव्हे तर पक्षाची सुरूवातीपासून कास धरलेल्या निष्ठावंतांना डावलले जात असल्याच्या मुद्यावर त्यांनी पक्षाला धारेवर धरले आहे. येथील महापालिकेच्या निवडणुकीची पक्षाने ज्यांच्यावर सोपविली त्या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल या मंत्र्यांसह पक्षाच्या पदाधिका-यांवर त्यांची आगपाखड सुरूच आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभेत घडलेल्या प्रकारानंतर आमदार गोटे यांनी येत्या सोमवार १९ रोजी आमदारकीचा राजीनाम्याची घोषणा करत स्वत:ला या निवडणुकीत महापौर पदाचे उमेदवारही जाहीर केले आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. हे सुरू असताना आमदार गोटे यांनी पक्षाचे निवडणूक मध्यवर्ती कार्यालय सुरू करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेऊन टाकल्या. त्यानंतर दुस-या गटातर्फे पाचव्या गल्लीत निवडणूक कार्यालय सुरू करून इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यामुळे कार्यकते विभागले गेल्याची चर्चा आहे. संभाव्य उमेदवारांची यादी पक्षाकडे गेली असून नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत संपल्यानंतर म्हणजे २० तारखेनंतर पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. तर दुसºया म्हणजे आमदार गोटे यांच्या गटातर्फे २० तारखेला संध्याकाळी आमदार गोटे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी एक दिवस आधी ते आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविणार आहेत. या निवडणुकीत ५० पेक्षा जास्त जागा मिळवून सत्ताप्राप्तीचा दावा करणाºया या पक्षात निवडणुकीपूर्वीच अंतर्गत बेदिली दिसून येत आहे. अशा स्थितीत संभ्रम वाढीस लागला आहे. सत्ताधारी राष्टÑवादी कॉँग्रेसला आव्हान उभे करत असताना पक्षातील या अंतर्गत कुरबुरींनी मोठे स्वरुप धारण केले आहे. तेही या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या तोंडावर घडत असल्याने कार्यकर्ते, नागरिक संभ्रमात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा निवडणुकीचे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित केला जात आहे. एकदिलाने, एकजुटीने पक्ष निवडणुकीला सामोरे गेला तर सत्ताप्राप्तीचे लक्ष्य भेदता येणार आहे. परंतु तत्पूर्वीच हा संघर्ष उभा राहिला असून तो महानगर, जिल्ह्यापुरता सीमित राहिलेला नाही. तो पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचला आहे. नामनिर्देशन पत्रे करण्यासाठी आता दोन दिवसांचीच मुदत राहिली असून अद्याप दोन्ही गटांत समेट झालेला नाही. तसे होण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे पुढे काय होणार, प्रत्यक्षात काय घडणार, या विषयी भाकिते, अंदाज वर्तविण्यात येत असून त्यावरच चर्चा झडताना दिसत आहे. दोन्ही गटांतर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा स्वाभाविक वाढल्या आहेत. मीच बरोबर या आपापल्या भूमिकांवर दोन्ही गट अद्याप कायम आहेत. जाहीर सभेतील प्रकार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोरच घडला. त्यामुळे जे काय ठरणार, होईल ते पक्षाच्या पातळीवरून होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे पक्ष म्हणून या संदर्भात काय भूमिका घेतली, याकडे साºयांचे लक्ष आहे. नामनिर्देशन पत्र  भरण्याची अंतिम मुदत संपण्यापूर्वीच काहीतरी तोडगा निघावा, अशी अपेक्षा सर्वसंबंधित घटकांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे. एक पक्ष म्हणून महानगर पालिकेच्या निवडणुकीत सहभागी होत सत्ताप्राप्तीचा दावा करणारा भारतीय जनता पक्ष हे अंतर्गत कलह मिटविण्याचे आव्हान कसे पेलतो, याकडे सा-यांचे लक्ष आहे. त्यावर त्या पक्षाचे यशापयशाचे गणितही अवलंबून आहे.

Web Title: BJP's internal challenge is challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे